कुलुप लाऊन महिला गेली माहेरी, चोरट्याने केली १.५२ लाखाची चोरी

By दयानंद पाईकराव | Updated: June 22, 2023 13:40 IST2023-06-22T13:39:06+5:302023-06-22T13:40:00+5:30

गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु

Locked woman went home, thief stole 1.52 lakhs | कुलुप लाऊन महिला गेली माहेरी, चोरट्याने केली १.५२ लाखाची चोरी

कुलुप लाऊन महिला गेली माहेरी, चोरट्याने केली १.५२ लाखाची चोरी

नागपूर : घराला कुलुप लाऊन माहेरी गेलेल्या महिलेच्या घरातील १.५२ लाखांचा मुद्देमाल पळविल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सतिश बाबुलाल नागले (वय ३८, रा. मंगलम सोसायटी, विजयनगर नारा) हे मंगळवारी २० जूनला दुपारी दोन ते सायंकाळी ७.४५ दरम्यान कामावर गेले होते. त्यांच्या पत्नी घराला कुलुप लाऊन माहेरी गेल्या. दरम्यान अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरुममधील लाकडी कपाटातून सोन्याचांदीचे दागीने व रोख ४० हजार असा एकुण १ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. सतिश नागले यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.
 

Web Title: Locked woman went home, thief stole 1.52 lakhs