शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

बँकांना कुलूप, रस्त्यावर घोषणाबाजी

By admin | Updated: January 9, 2016 03:40 IST

शहरातील अनेक बँकांना शुक्रवारी कुलूप लावलेले होते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहारात अडचणी आल्या.

संपात हजारो कर्मचारी सहभागी : दिवसभर कामकाज ठप्पनागपूर : शहरातील अनेक बँकांना शुक्रवारी कुलूप लावलेले होते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहारात अडचणी आल्या. तर बँक कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर येऊन नारेबाजी केली. स्टेट बँक आॅफ इंडिया व असोसिएट बँक व्यवस्थापनादरम्यान झालेल्या द्विपक्षीय कराराला घेऊन बँक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. या कराराला विरोध करण्यासाठी आॅल इंडिया बँक इम्प्लॉईज असोसिएशनच्या नेतृत्वात संप पुकारून कर्मचाऱ्यांनी बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर निदर्शने केली. एमबीईए चे उपमहासचिव जयवंत गुर्वे, संघटन सचिव मिलिंद वासनिक, सुरभी शर्मा, वेंडिल अय्यर, वीरेंद्र गेडाम यांनी नेतृत्व केले. सुरवातीला ए.बी. बर्धन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संपात सुरेश बोबाटे, वंदना मुजुमदार, विद्या जोशी, अशोक अतकरे, एस.पी. तिवारी, पी.जी. मेश्राम, गुणवंत भुजाडे, रवी जोशी, विजय ठाकूर, अरविंद कुराडकर, पंकज शिंपी, रमेश चौधरी, एस.पी. राव, जे. राधाक्रिष्णन, अंजली महाजन, रमेश असनानी, दर्शन नायडू, किशोर बिरेवार, अरुण कुंभारे, किशोर चिचघरे, अरुण कुथे, रमेश पिंपरकर, के. डी. खापरे, नरेंद्र भुजाडे, विकास शेगोकार, संदीप पाली, मो. अश्फाक, विजय जोध, सरोज कनोजे, स्वाती रंगारी, प्रीती सोनुले, शांती बडिया, किरण हेगे, विशाल तिवारी, श्रीधर बोरकर, किशोर चिचघरे, निर्मला सोरटे, पंकज गजभिये, आरती किलेदार, राकेश माहुले, प्रवीण सहारे, स्वाती सपाटे, अनुजा बेले आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)बँक कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला समर्थन - दामलेएआयटीयूसी महाराष्ट्राचे अध्यक्ष सुकुमार दामले म्हणाल ेकी, बँक कर्मचाऱ्यांच्या या संघर्षाला आमचे समर्थन आहे. बँकेच्या विलिनीकरणामागे छुपा अजेंडा असल्याचा आरोप करीत, त्याविरोधात संघर्ष सुरू ठेवणार आहे. कर्मचाऱ्यांनी एकजूट ठेवावी - शर्माएआयबीईए चे महासचिव बी. एन. शर्मा यांनी संपात सहभागी बँक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून, या संघर्षाविरुद्ध एकजूट ठेवण्याचे आवाहन केले. पुढे हा संघर्ष आणखी रेटून धरायचा आहे, त्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. सरकारची धोरणे कर्मचारी विरोधी - गुप्ताईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष रामकुमार गुप्ता म्हणाले की, सरकारचे श्रम व श्रमिक विरोधी धोरणाविरुद्ध एकत्र येऊन संघर्ष करणे गरजेचे आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाने करिअर प्रोग्रेस स्कीमचे धोरण असोसिएट्स बँकेवर जबरदस्तीने लादले आहे. याचा विरोध करीत, बँकेच्या द्विपक्षीय करारावरही त्यांनी टीका केली.