'स्थानिक निवडणुका कार्यकर्त्यांच्या.. निवडणुकीत युती वा आघाडीचा निर्णय तेच घेतील' : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:23 IST2025-10-06T15:22:25+5:302025-10-06T15:23:42+5:30
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ : संविधान सत्याग्रह यात्रा वर्षभर चालणार

'Local elections are for the workers... they will decide on alliance or front in the elections': Congress state president Harshvardhan Sapkal
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही, याबाबचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा व ब्लॉक स्तरावरील स्थानिक नेत्यांना दिले असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
या स्थानिक निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, या निवडणुकीत युती वा आघाडीचा निर्णय स्थानिक पातळी घेणे गरजेचे असून यानुसार तसे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, प्रसन्ना तिडके, शकूर नागाणी गिरीश पांडव पदाधिकारी यांच्यासह उपस्थित होते. काँग्रेसचे २० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत काढण्यात आलेल्या दीक्षा भूमी ते पवनार संविधान सत्याग्रह पदयात्रेची सेवाग्राम येथे यशस्वी सांगता झाली.
ही यात्रा वर्षभर चालणार असल्याचे सपकाळ यांनी सांगतले. संघाचा लोकशाहीवर विश्वास नाही का? असा सवालही सपकाळ यांनी केला. मतपरिवर्तन करुन संविधान संघाने स्विकारावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बिहारमध्ये मदत अन् शेतकऱ्यांसाठी पैसा नाही
- बिहारमध्ये निवडणुका आहे निवडणुका आहे म्हणून केंद्र सरकारने तेथील १ महिलांच्या खात्यावर दहा-दहा हजार, अन् महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू आहे.
- सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करून कर्जमुक्त्ती जाहीर करण्याची मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
- जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान झाले. मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे नाटक न करता तातडीने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
समाजासमाजांत भांडणे लावली
- हैदराबाद गॅझेटमधील तरतुदी ग्राह्य धरून महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासन निर्णय जारी केला. मात्र जीआर काढला आणि मराठा व ओबीसी समाजात भांडणे लावली, असा घणाघात हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीवर केला. तेलंगणा सरकारने जातनिहाय जनगणना करून त्यांच्या राज्यातील ओबीसी समाजाला ४२ टक्के आरक्षण दिले. राज्यातही जातनिहाय गणना करून आरक्षण देण्याची मागणी सपकाळ यांनी केली.
- नथुरामचे उदात्तीकरण सोडून गांधींचे अनुयायी व्हा
- महात्मा गांधी यांची विचारधारा जगभरात पसरली आहे. २०० देशांत त्यांचे पुतळे आहेत. हिंदुत्वाचा दूत म्हणून त्यांची ओळख आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघााची ओळख हिंचारामुळे आहे. संघाने नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याचे सोडून महात्मा गांधी यांचे अनुयायी व्हावे, असे आवाहन सपकाळ यांनी केले.