भरधाव कंटेनर नालीत शिरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:12 IST2021-08-24T04:12:16+5:302021-08-24T04:12:16+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : वेगात जाणारा कंटेनर राेडलगतच्या नालीत शिरला. यात चालकाचा मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. ...

The loaded container entered the drain | भरधाव कंटेनर नालीत शिरला

भरधाव कंटेनर नालीत शिरला

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवलापार : वेगात जाणारा कंटेनर राेडलगतच्या नालीत शिरला. यात चालकाचा मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील हरणाकुंड शिवारात साेमवारी (दि. २३) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

राजकुमार किसनसिंग (५०, रा. बडसर, कर्वेटोला, हमीदपूर, हिमाचल प्रदेश) असे मृत कंटेनर चालकाचे नाव आहे. ताे एनएल-०१/एबी-९०८८ क्रमांकाच्या कंटेनरने नागपूरहून जबलपूरकडे जात हाेता. दरम्यान, हरणाकुंड शिवारात त्याचा ताबा सुटला व कंटेनर राेडलगतच्या नालीत शिरला. मात्र, या कंटेनरने झाडाला अथवा कशालाही धडक दिली नसताना चालकाचा मृत्यू झाला. चालकाला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नव्हती. शिवाय, कंटेनरच्या केबिनमध्ये ताे एकटाच हाेता. त्यामुळे त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाला असावा, असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण उत्तरीय तपासणी अहवालात स्पष्ट हाेणार असल्याची माहिती ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांनी दिली.

Web Title: The loaded container entered the drain