शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मधील महिला पोटगीस अपात्र

By admin | Updated: March 8, 2015 13:12 IST

पतीशी घटस्फोट न घेता परपुरुषासोबत ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेला ‘घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा-२००५’अंतर्गत पोटगी ...

राकेश घानोडे नागपूर पतीशी घटस्फोट न घेता परपुरुषासोबत ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेला ‘घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा-२००५’अंतर्गत पोटगी किंवा अन्य कोणतेही लाभ दिले जाऊ शकत नाही, असा खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावर निर्णय देताना केला आहे.या कायद्याचा लाभ मिळण्यासाठी कलम २ (एफ) मधील व्याख्येनुसार घरगुती नाते असणे आवश्यक आहे. यात अन्य मार्गांसह विवाह किंवा विवाह स्वरूपाच्या संबंधातून दोन व्यक्तींनी एकाच घरात राहण्यालाही घरगुती नाते समजण्यात आले आहे. अविवाहित महिलेला ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहिल्यानंतर घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत लाभ मिळू शकतात. यासाठी तिला लग्न करण्याची गरज नाही. परंतु ती महिला व संबंधित पुरुष कायद्यानुसार लग्न करण्यास पात्र पाहिजेत. ते लग्नाच्या वयाचे असायला हवेत. समाज पती-पत्नी म्हणून ग्राह्य धरतील अशाप्रकारे त्यांनी सोबत राहायला पाहिजे. परंतु एखादी विवाहित महिला पतीशी घटस्फोट न घेता परपुरुषासोबत राहात असल्यास तिला घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत लाभ दिले जाऊ शकत नाही. कायद्यानुसार ती महिला संबंधित पुरुषासोबत विवाह करण्यास अपात्र आहे. अशा प्रकरणातील संबंधाला घरगुती नाते मानता येणार नाही. विवाहित महिला परपुरुषासोबत घरगुती नाते ठेवू शकत नाही. घरगुती हिंसाचार कायदा लागू होण्यासाठी केवळ विवाह झाल्याप्रमाणे ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणे पुरेसे नाही. संबंधित महिला व पुरुष कायद्यानुसार विवाह करण्यास पात्र असणेही आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या युगलपीठाने ‘दुर्गेश युवराज रहांगडाले’ आणि सर्वोच्च न्यायालयाने ‘इंदिरा शर्मा’ प्रकरणात दिलेल्या निर्णयाचे अवलोकन केल्यानंतर कायद्यातील तरतुदींवर हा सखोल उहापोह करण्यात आला आहे.