शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
2
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
3
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
4
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
5
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
6
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
7
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
8
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
9
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
10
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
11
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
15
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
16
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
17
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
18
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
19
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
20
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
Daily Top 2Weekly Top 5

अंधाराशी युद्ध करणारे ‘लाईनमन’

By admin | Updated: June 12, 2014 01:14 IST

बुधवारचा दिवस. शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित. देखभाल-दुरुस्ती सुरू असल्याने दुपारी १ वाजतानंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत होईल, असे वीज वितरण कंपनीकडून मिळणारे उत्तर.

प्रतिकूल स्थितीत काम : सायकलवर ‘पेट्रोलिंग’
कमल शर्मा - नागपूर
बुधवारचा दिवस. शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित. देखभाल-दुरुस्ती सुरू असल्याने दुपारी १ वाजतानंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत होईल, असे वीज वितरण कंपनीकडून मिळणारे उत्तर. महावितरण या दिवशी नेमके करते तरी काय, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत चमू’ थेट दुरुस्तीच्या ठिकाणी पोहोचली. तेथे ‘लाईनमन च्या कामाच महत्त्व कळलं. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांचे अंधाराशी युद्ध सुरु होते.
वयाची पन्नासी पार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सफाईने खांबावर चढताना आणि उतरताना पाहिल्यावर त्यांच्याशी चर्चा केल्यावर तेच महावितरणचा आधारस्तंभ असल्याचे स्पष्ट झाले.
विजेचे खांब लावतानाच ग्राहकांच्या घरी २४ तास वीजपुरवठा होतो किंवा नाही याची खबरदारी घेतानाच पुरवठा खंडित झाल्यास त्यामागची कारणे शोधून तो सुरळीत करण्याची जबाबदारीही या कर्मचाऱ्यांचीच असते. कधी सायकलवर तर कधी दुचाकीवर ते त्यांच्या भागात ‘पेट्रोलिंग’ करतात. अनेक वेळा जीव धोक्यात घालून त्यांना खांबावर चढावे लागते. महावितरणमधील ६० टक्के ‘लाईनमन’ मधुमेहाने पीडित आहेत. बहुतांश जणांना अर्धांगवायूचा झटका आला आहे.
कामाची वेळ अनिश्चित
बेसा पॉवर हाऊसमध्ये काम सुरू होते. तेथे ‘लोकमत चमू’ पोहोचली. तेथे १२ पेक्षा अधिक कर्मचारी फिडर दुरुस्तीचे काम करीत होते. सेवानिवृत्तीच्या जवळ पोहोचलेले उमाकांत कोलते हे यापैकीच एक. ते म्हणाले की, कामाची वेळ निश्चित नाही. कामाची वेळ जरी आठ तास असली तरी, आपात्कालीन स्थितीत कधी १२ तर कधी १६ तास काम करावे लागते. उशिरा रात्री कॉल आल्यावर १५ मिनिटात संबंधित ठिकाणी पोहोचावे लागते. कुटुंबीयांनाही याची सवय झाली आहे.
अपघाताची चिंता नाही
दुरुस्तीचे काम करताना अनेक वेळा धोका संभवतो. विजेचा धक्काही बसतो. पण त्याची चिंता करत नाही. वीज पुरवठा सुरळीत करणे यालाच कर्मचाऱ्यांचे प्राधान्य असते, असे सदाशिव मानकर म्हणाले.
वीज ग्राहक आमचे कुटुंबीबेसा येथे काम करणारे प्रशांत आकरे म्हणाले की, वीज ग्राहकांना आम्ही आमच्या कुटुंबातील सदस्यच मानतो. ते अंधारात राहू नये, असेच आमचे प्रयत्न असतात. विविध सोयी आणि सुविधांच्याबाबतीत आम्ही सरकारशी लढतो. पण ग्राहकांना सेवा देताना याचा विचार कधीच करीत नाही.