रामटेक तीळभांडेश्वर मंदिरावर कोसळली वीज ! मंदिराच्या घुमटाला गेले तडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:51 IST2026-04-03T12:50:38+5:302026-04-03T12:51:50+5:30
Nagpur : रामटेक शहरातील आझाद वॉर्डमध्ये असलेल्या प्राचीन तीळभांडेश्वर मंदिरावर बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास वीज कोसळली. जोरात कडाडलेल्या वीजेने मंदिराच्या घुमटाला तडे गेले.

Lightning struck the Ramtek Tilbhandeshwar temple! Cracks appeared in the dome of the temple
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक शहरातील आझाद वॉर्डमध्ये असलेल्या प्राचीन तीळभांडेश्वर मंदिरावर बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास वीज कोसळली. जोरात कडाडलेल्या वीजेने मंदिराच्या घुमटाला तडे गेले. आतील भागातील विजेचा बोर्ड व वायरिंग पूर्णपणे जळाली. ही वीज कोसळली तेव्हा मंदिरात किंवा परिसरात कुणीही नव्हते. त्यामुळे सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.
नागपूरला पारा ७.८ अंशांनी घसरला; ४ एप्रिलपर्यंत गारवा
पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात मोठ्या फरकाने घसरण झाली. नागपूरचे तापमान ७.८ अंशाने खाली घसरत ३१.४ अंशावर पोहोचले, जे सरासरीपेक्षा ८ अंशाने कमी आहे. भंडारा ७ अंशाने घसरून सर्वात कमी ३१ अंशावर, गोंदिया ५.५ अंशाने घसरून ३२.६ अंश, वर्धा ३ अंशाने घसरून ३७.५ अंश नोंदविले गेले. चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती व इतर जिल्ह्यातही तापमान २ ते ३ अंशाने खाली घसरले. त्यामुळे मार्चपासून सूर्याचा प्रकोप झेलणाऱ्या नागरिकांना गारव्याचा दिलासा मिळाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ४ एप्रिलपर्यंत असेच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
गावरान आंब्याला फटका
विदर्भात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आंबा बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. आंब्याची मोहर नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत्. विदर्भात वादळी वाऱ्यामुळे कैऱ्या गळून पडल्या असून गावरान आंबा उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे.