शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या घरात समृद्धीचा दिवा पेटवा, मदत देताना २ हेक्टरपर्यंत मर्यादा नकोच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 14:51 IST

Nagpur : मराठवाड्यात यंदा पुराने कहर केला. नागपूरसह विदर्भात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दिवाळी तोंडावर असताना शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककामठी : मराठवाड्यात यंदा पुराने कहर केला. नागपूरसहविदर्भात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दिवाळी तोंडावर असताना शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांच्या घरात आशेचा दिवा पेटविण्यासाठी सरकारने नुकसान भरपाई करताना २ हेक्टरपर्यंत मर्यादा शिथिल करून पूर्वीप्रमाणे ३ हेक्टर क्षेत्रापर्यंत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हुकूमचंद आमधरे यांनी राज्याचे पणन व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या भेटीत आमधरे यांनी विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा रावल यांच्याकडे मांडल्या.

व्यथा रावल यांच्याकडे मांडल्या. बाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची तातडीने मदत करावी. ज्या भागात पूरस्थिती बिकट आहे अशा जिल्ह्यात सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. सर्व पिकांसाठी भावांतर योजना लागू करावी. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. सर्व सरकारी योजना मंजुरीची कागदोपत्री प्रक्रिया सुलभकरावी. ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहरात राहण्यासाठी मोफत वसतिगृह सुरू करावे. मनरेगा योजना लागू करावी आणि प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतअंतर्गत कामे सुरू करावीत. यासाठी तालुका स्तरावर यंत्रणा उभी करावी. ज्या परिवारातील सदस्य मृत्यू झाले आहेत, त्यांना मोबदला आणि सरकारी नोकरी द्यावी, अशा मागण्या आमधरे यांनी याप्रसंगी केल्यात.

English
हिंदी सारांश
Web Title : Light farmers' homes with prosperity; remove 2-hectare aid limit.

Web Summary : Hukumchand Amdhare urged Minister Jaykumar Rawal to increase farmer compensation to 3 hectares due to crop losses from heavy rains. He also requested immediate aid of ₹50,000 per hectare, drought declaration in affected districts, loan waivers, and streamlined government processes. Other demands included student housing and employment for families who lost members.
टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीnagpurनागपूरVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडा