नागपुरात बसचालकाने घेतला तरुणाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:57 IST2019-04-29T23:56:33+5:302019-04-29T23:57:07+5:30
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका अॅक्टिव्हाला कट मारून बसचालकाने अॅक्टिव्हावर बसलेल्या एका तरुणाचा बळी घेतला तर दुसऱ्याला गंभीर जखमी केले. सोमवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास वर्धा मार्गावरील चिंचभुवन पुलाजवळ हा भीषण अपघात घडला.

नागपुरात बसचालकाने घेतला तरुणाचा बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका अॅक्टिव्हाला कट मारून बसचालकाने अॅक्टिव्हावर बसलेल्या एका तरुणाचा बळी घेतला तर दुसऱ्याला गंभीर जखमी केले. सोमवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास वर्धा मार्गावरील चिंचभुवन पुलाजवळ हा भीषण अपघात घडला.
अमरनगर (हिंगणा रोड) येथील रहिवासी रुषीलाल सुखराम उपरीकर (वय ३५) हे त्यांच्या एका मित्रासोबत अॅक्टिव्हा क्रमांक एमएच ४० / एएस ८६४९ ने चिंचभुवन पुलाजवळून जात होते. एमएच ४०/ एक्यू ६३९८ च्या एसटी बसचालकाने ओव्हरटेकच्या प्रयत्नात उपरीकरच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे ते आणि त्यांचा मित्र खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी उपरीकर यांना मृत घोषित केले. वर्दळीच्या मार्गावर झालेल्या या अपघातामुळे तेथे तणाव निर्माण झाला. त्यामुळे वाहतुकीलाही अडसर निर्माण झाला. माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली. सचितसिंग सुरजसिंग (वय ३८, रा. बकानेर, ता. रोहता, जि. रोहता) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी बसचालक प्रदीप सुदाम मसराम (वय ४६, रा. चिकनी डोमणा, ता. नेर, जि. यवतमाळ) याला अटक केली.