शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नामांतर आंदोलनातील ‘लाँगमार्च’चा प्राण म्हणजे इ.मो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:36 IST

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी दीक्षाभूमीवरून ऐतिहासिक असा ‘लाँगमार्च’ निघाला. दररोज शेकडो मैल चालून भीमसैनिक थकून जात होते. त्यांचे पाय रक्तबंबाळ होत असत. अशा थकलेल्या भीम सैनिकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करून त्यांच्या रक्तबंबाळ पायांना पुन्हा चालण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम तेव्हा खऱ्या अर्थाने इ.मो. नारनवरे यांच्या गीतांनी केले. त्या ऐतिहासिक लाँगमार्चचा प्राण म्हणजे इ.मो. नारनवरे होत, अशा शब्दात लाँगमार्चचे प्रणेते सरसेनापती प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी त्यांचा गौरव केला.

ठळक मुद्देजोगेंद्र कवाडे : इ.मो. नारनवरे यांचा अमृत महोत्सवी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी दीक्षाभूमीवरून ऐतिहासिक असा ‘लाँगमार्च’ निघाला. दररोज शेकडो मैल चालून भीमसैनिक थकून जात होते. त्यांचे पाय रक्तबंबाळ होत असत. अशा थकलेल्या भीम सैनिकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करून त्यांच्या रक्तबंबाळ पायांना पुन्हा चालण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम तेव्हा खऱ्या अर्थाने इ.मो. नारनवरे यांच्या गीतांनी केले. त्या ऐतिहासिक लाँगमार्चचा प्राण म्हणजे इ.मो. नारनवरे होत, अशा शब्दात लाँगमार्चचे प्रणेते सरसेनापती प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी त्यांचा गौरव केला.ज्येष्ठ कवी व आंबेडकरी विचारवंत इ.मो. नारनवरे यांच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आॅडिटोरियम दीक्षाभूमी येथे त्यांचा शाल, गौरवपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी आपले विचार व्यक्त करताना प्रा. कवाडे बोलत होते. आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर हे अध्यक्षस्थानी होते. तर माजी मंत्री नितीन राऊत, प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम, ज्येष्ठ साहित्यिक धर्मराज निमसरकर, सामाजिक कार्यकर्त्या तक्षशीला वाघधरे, गीता नारनवरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, प्रत्येक शब्दाचा वापर हा आंबेडकरी आणि तथागत बुद्धाची निष्ठेशी सुसंगत राहील, यावर इ.मो. नारनवरे यांचा भर राहिलेला आहे. अक्षरांची दगडफेक आणि शब्दांचा गोळीबार काय असतो हे त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवते. लाँगमार्चमध्ये आम्ही तो अनुभवले आहे. नामांतराच्या आंदोलनातील चंदरची त्यांनी लिहिलेली कथा अंगावर शहरे आणते. त्यांनी लिहिलेले ‘जयभीम हमारा नारा है, जयभीम देश हमारा है’ हे गीत म्हणजे देशातील समस्त शोषित वंचितांचे राष्ट्रगान व्हावे, असे आहे. ते केवळ लेखक नसून प्रसंगी रस्त्यावर उतरणारा कार्यकर्तासुद्धा आहे. अशा शब्दात त्यांनी इ.मो. नारनवरे यांचा गौरव केला. आज देशात भीषण परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत ज्यांना बुद्धाची शांती समजत नसेल त्यांना भीमाच्या क्रांतीने समजावण्याची गरज आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.अध्यक्षीय भाषणात ताराचंद्र खांडेकर म्हणाले, इ.मो. नारनवरे यांनी आंबेडकरी चळवळीची सांस्कृतिक पुनर्रचनेची पायाभरणी करताना कधीही लाचारी किंवा तडजोड स्वीकारली नाही. आंबेडकरी निष्ठा आयुष्यभर जबाबदारीने स्वीकारल्यामुळेच ते इतरांसाठी मार्गदर्शक ठरतात. नितीन राऊत म्हणाले, नामांतराचे आंदोलन खºया अर्थाने पेटवण्याचे काम हे इ.मो. नारनवरे यांच्या गीतांनी केले. यावेळी धर्मराज निमसरकार, तक्षशीला वाघधरे यांनीही त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आपल्या सत्काराला उत्तर देतांना इ.मो. नारनवरे यांनी चळवळीची नाळ तुटू देऊ नका. चळवळीतील नेत्यांवर आरोप करीत असताना त्यांनी चळवळीसाठी काय केले आहे, याचीही जाणीव ठेवा, असे आवाहन केले.प्रास्ताविक का.रा. वालदेकर यांनी केले. नीलकांत कुलसंगे यांनी गौरवपत्राचे वाचन केले. संचालन पल्लवी जीवनतारे यांनी केले. नरेश वाहाने यांनी आभार मानले.‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’चे काव्यात्मक लेखन हे ऐतिहासिक कार्ययावेळी चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, इ.मो. नारनवरे यांनी अनेक कार्य केले. परंतु बुद्ध आणि त्यांचा धम्म या ऐतिहासिक ग्रंथाचे काव्यात्मक लेखन हे त्यांच्या जीवनातील ऐतिहासिक कार्य असल्याचे आपण मानतो. हा ग्रंथ लवकरच प्रकाशित व्हावा. त्याची जबबादारी आपण स्वीकारायला तयार आहोत. तसेच इ.मो. नारनवरे यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याची आपण जबाबदारी घेत असल्याचेही त्यांनी यावेळी घोषित केले.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक