कराटेपटूवर बलात्कार करणाऱ्याला जन्मठेप

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 4, 2023 17:43 IST2023-12-04T17:42:34+5:302023-12-04T17:43:06+5:30

नितीश उर्फ सूर्या उर्फ सोनू गुप्ता (३२) असे आरोपीचे नाव असून तो रामबाग कॉलनी येथील रहिवासी आहे.

Life imprisonment for rape of karate player in nagpur | कराटेपटूवर बलात्कार करणाऱ्याला जन्मठेप

कराटेपटूवर बलात्कार करणाऱ्याला जन्मठेप

नागपूर : इमामवाडा येथील अल्पवयीन कराटेपटू मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला सोमवारी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, एकूण सहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. सत्र न्यायालयाचे न्या. आर. पी. पांडे यांनी हा निर्णय दिला.

नितीश उर्फ सूर्या उर्फ सोनू गुप्ता (३२) असे आरोपीचे नाव असून तो रामबाग कॉलनी येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १२ वर्षे वयाची होती. ती इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होती. तसेच, राेज सायंकाळी ६ वाजता कराटे प्रशिक्षणाला जात होती व रात्री ८ वाजता घरी परत येत होती. २० जुलै २०१६ रोजी ती नेहमीप्रमाणे कराटे प्रशिक्षणाला गेली. त्यानंतर सायंकाळी ७.३० च्या सुमारास घरी परतत असताना तिला मेडिकल चौकात आरोपी भेटला. आरोपीकडे काळ्या रंगाची दुचाकी होती. दरम्यान, त्याने स्वत:हून मुलीसोबत ओळख वाढविण्याचा प्रयत्न केला. मुलगी त्याला टाळून पुढे निघून गेली असता त्याने पाठलाग करून तिचे नाक रुमालने दाबले. त्यामुळे मुलीची शुद्ध हरविली. त्यानंतर आरोपीने मुलीला टीबी वॉर्डच्या निर्जन परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. आसावरी परसोडकर यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध ठोस पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.

Web Title: Life imprisonment for rape of karate player in nagpur