शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

विदर्भातील चार जिल्ह्यांचे जनजीवन उद्यापासून रुळावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोना पॉझिटिव्हिटी दर तसेच रुग्णांनी व्यापलेले ऑक्सिजन बेड या दोन निकषाच्या आधारे सोमवारपासून ‘अनलॉक’ प्रक्रिया सुरू ...

नागपूर : कोरोना पॉझिटिव्हिटी दर तसेच रुग्णांनी व्यापलेले ऑक्सिजन बेड या दोन निकषाच्या आधारे सोमवारपासून ‘अनलॉक’ प्रक्रिया सुरू होत आहे. निकषाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, गोंदिया, यवतमाळ व चंद्रपूर या चार जिल्ह्यांचे जनजीवन रुळावर येण्याची शक्यता आहे. तर, तिसऱ्या टप्प्यातील भंडारा, वाशिम, अकोला, वर्धा, अमरावती, गडचिरोली व बुलडाणा जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित जिल्हा प्रशासन सोमवारी निर्णय घेणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के व ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असतील त्या जिल्ह्यात जवळपास पूर्ण ‘अनलॉक’ असेल. त्यानुसार पहिल्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यांमध्ये मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांसाठी वेळेचे बंधन नसेल. तर दुसऱ्या टप्प्यात यासाठी ५० टक्केच उपस्थितीची अट असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र, सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील. तर चौथ्या टप्प्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील आणि इतर दुकाने बंद राहतील. पाचव्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू राहतील. या ठिकाणी वीकेंड लॉकडाऊन लागू असेल. जिल्ह्याच्या आकडेवारीनुसार जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात येणार आहेत.

- चार जिल्हे ‘अनलॉक’च्या पहिल्या टप्प्यात

जिल्हा : पॉझिटिव्हिटीचा दर : ऑक्सिजन बेड रिकामे

नागपूरचा :३.८६ टक्के : ९१ टक्के

चंद्रपूर :२.९९ टक्के :८५ टक्के

यवतमाळ : १.४५ टक्के : ७५ टक्के

गोंदिया : २.७ टक्के : ९६ टक्के

- सात जिल्ह्यात अंशत: ‘अनलॉक’!

जिल्हा : पॉझिटिव्हिटीचा दर : व्यापलेले ऑक्सिजन बेड

भंडारा : ७.६७ टक्के :४.४१ टक्के

वाशिम : २.१ टक्के : ८ टक्के

अकोला :७.२४ टक्के : ४४.६७ टक्के

वर्धा : ७.५७ टक्के : ४.०४ टक्के

अमरावती: ४.६० टक्के : २४ टक्के

गडचिरोली: ६.५१ टक्के : ५.९२ टक्के

बुलडाणा:१०.०३ टक्के : ८ टक्के

-तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध

-अत्यावश्यक वस्तू व सेवासंबंधी व्यवसाय व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.

- इतर सर्व व्यवसाय व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.

- रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ४ या वेळेत ५० टक्के आसनक्षमतेनुसार सुरू राहील.

- सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, उद्याने, बगीचे, मॉर्निंग वॉक व सायकलिंग दररोज पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहील.

- सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सोमवार ते शुक्रवारी ५० टक्के उपस्थितीत (सभागृहाच्या क्षमतेच्या) सायंकाळी ४ वाजेपर्यंत मुभा असेल.

- लग्नसोहळ्यास ५० जणांची उपस्थिती. अंत्यसंस्कार २० जणांची उपस्थिती. इतर बैठका ५० टक्के उपस्थिती राहील.

- कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई-कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी राहील.