शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही आरटीओमधून मिळणार लायसन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 02:27 IST

आरटीओने सुरू केलेल्या शिकावू वाहन परवानासाठी (लर्निंग लायसन्स) आॅनलाईन अपॉईंटमेंट योजनेत

शहर आरटीओचा पुढाकार : अपॉर्इंटमेंटची प्रतीक्षा कमी होणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आरटीओने सुरू केलेल्या शिकावू वाहन परवानासाठी (लर्निंग लायसन्स) आॅनलाईन अपॉईंटमेंट योजनेत उमेदवाराला सोयीनुसार अपॉर्इंटमेंट मिळत नाही. यावर उपाय म्हणून नागपूर शहर आरटीओ कार्यालयाने कोणत्याही आरटीओ कार्यालयामधून लर्निंग लायसन्सची प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना तयार केली असून लवकरच ती कार्यान्वित होणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज सुनियोजित पद्धतीने व अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी राज्यभरात शिकाऊ व पक्क्या वाहन परवानासाठी ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ योजना सुरू करण्यात आली. शहरात १७ सप्टेंबर २०१४ पासून या योजनेची सक्ती करण्यात आली. परंतु तीन वर्षांचा कालावधी होऊनही नागपूर शहर, ग्रामीण आरटीओ व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आॅनलाईन अपॉर्इंटमेंटचा गोंधळ कायम आहे. संबंधित संकेत स्थळावर विविध आॅप्शन आणि अमुक बटनांवर क्लिक करण्याच्या अनेक सूचनांमुळे आॅनलाईन अपॉईंटमेंट सामान्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. परिणामी हा अर्ज भरून देण्यासाठी आरटीओ कार्यालयाच्या परिसरातच अनेकांनी लॅपटॉप ठेवून दुकाने थाटली आहे. उमेदवाराला १०० ते ५०० रुपयापर्यंतचा भुर्दंड पडत आहे. दुसरीकडे अपॉर्इंटमेंट दोन-तीन महिन्याच्या कालावधीनंतर मिळत आहे. यातून मार्ग काढत वाहन परवाना अर्जदारांना सोयीचे व्हावे, अपॉर्इंटमेंटची प्रतीक्षा कमी व्हावी, म्हणून शहर आरटीओ कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी पुढाकार घेतला. त्यांनी, शहरातील ज्या आरटीओ कार्यालयात सोयीनुसार अपार्इंटमेंट मिळत आहे तिथे संगणक परीक्षा देऊन पास झाल्यास शिकाऊ परवाना देण्याची योजना तयार केली. दोन महिन्यांपूर्वी तसा प्रस्ताव परिवहन आयुक्तांकडे पाठविला. तेथून हा प्रस्ताव ‘एनआयसी’कडे (राष्ट्रीय माहिती सेवा केंद्र) गेला आहे. अद्याप याला मंजुरी मिळाली नसली तरी प्राथमिक स्वरूपात ही योजना राबविण्याची तयारी सुरू आहे. आॅगस्टपासून क्रियान्वित करण्याचा प्रयत्न शहरातील कोणत्याही आरटीओ कार्यालयातून शिकावू वाहन परवाना काढण्याची योजना आॅगस्ट महिन्यापासून सुरू करण्याचा प्रयत्न आहे. हा परवाना मिळाल्यानंतर उमेदवाराला त्याच्या संबंधित आरटीओ कार्यालयातूनच पक्क्या वाहन परवानासाठी अर्ज करावा लागेल. यामुळे सोईनुसार अपॉर्इंटमेंट मिळू शकेल. -शरद जिचकार प्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ नागपूर शहर.