त्यांना काय शोधायचे ते शोधू द्या, ३२ वर्षांच्या युवा तरुणाने सरकारला... : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 06:01 IST2022-12-23T06:00:07+5:302022-12-23T06:01:11+5:30

आदित्य ठाकरेंनी साधला सत्ताधाऱ्यांवार जोरदार निशाणा.

Let them find what they want govt scared 32 year old youth Aditya Thackeray disha salian maharashtra winter session | त्यांना काय शोधायचे ते शोधू द्या, ३२ वर्षांच्या युवा तरुणाने सरकारला... : आदित्य ठाकरे

त्यांना काय शोधायचे ते शोधू द्या, ३२ वर्षांच्या युवा तरुणाने सरकारला... : आदित्य ठाकरे

नागपूर : ‘त्यांना काय शोधायचे ते शोधू द्या. एका ३२ वर्षांच्या तरुणाने सरकारला हलवून सोडल्यामुळे सत्तापक्षाचा हा खटाटोप सुरू आहे,’ असे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

दिशा सालियान प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी होणार असल्याची घोषणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना आदित्य म्हणाले, जी व्यक्ती हयात नाही आणि ज्या व्यक्तीच्या आई- वडिलांनी थेट राष्ट्रपती महोदयांकडे पत्र लिहून बदनामी थांबविण्याची विनंती केली, अशा व्यक्तीचा मुद्दा उचलून सत्ताधारी पक्ष गोंधळ घालत आहे. हा प्रकार फारच क्लेषदायक आहे.  

नागपूर एनआयटीच्या भूखंड  प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर आलेले बालंट टाळण्यासाठी, सत्तापक्षाचा हा खटाटोप आहे, या शब्दांत आदित्य यांनी सरकारवर हल्ला केला.

Web Title: Let them find what they want govt scared 32 year old youth Aditya Thackeray disha salian maharashtra winter session