शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत बिबट्या मृतावस्थेत

By admin | Updated: January 8, 2015 00:02 IST

खेड तालुक्यातील घटना : वनविभागाच्या मदतीने काढले बाहेर

आवाशी (जि. रत्नागिरी) : खेड तालुक्यातील आवाशी येथे एका सार्वजनिक विहिरीत आज, बुधवारी दुपारी बिबट्या मृतावस्थेत आढळला. वनविभागाच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले.येथील सार्वजनिक विहिरीची स्वच्छता व साफसफाई करण्यासाठी आवाशी ग्रामपंचायतीचे कर्मचारी राकेश हरिश्चंद्र आंब्रे हे सकाळी साडेदहा वाजता टीसीएल पावडर टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी आतमध्ये बिबट्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तो हालचाल करीत नसल्याने मृत असल्याचा अंदाज त्यांना आला. त्यांनी सरपंच सुरेश राऊत यांना ही बाब तत्काळ कळविली. त्यांनी खेडचे वनपाल एस. जी. सुतार यांना दूरध्वनीवरून या घटनेची माहिती दिली. काडवलीचे वनरक्षक आर. डी. खोत, तळ्याचे यशवंत सावर्डेकर, खवटीचे म. को. जांभळे हेही घटनास्थळी दाखल झाले.या सर्वांनी बिबट्याला चारही बाजूने दोरी बांधून बाहेर काढले. तत्पूर्वी लोटेचे पोलीस शरद मांडवकर हेही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पंचनामा केला. बिबट्या मादी जातीचा असून, लांबी १५६ सें.मी. आहे. वय अंदाजे साडेतीन वर्षे असून, त्याचा काही दिवसांपूर्वी विहिरीत बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला. (प्रतिनिधी)