शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

डाळींवर मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व, कच्चा मालाची करतात साठवणूक

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 19, 2023 18:43 IST

स्टॉक मर्यादेची करावी तपासणी

नागपूर : वाढत्या महागाईने सामान्य ग्राहक आधीच त्रस्त आहेत. त्यातच डाळींच्या वाढत्या किमतीने त्यात भर टाकली आहे. तूर डाळ किरकोळ बाजारात १३५ ते १४५ रुपये किलो विकली जात आहे. डाळींच्या व्यवसायावर मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व असल्यामुळे दर भरमसाठ वाढल्याचा ग्राहक संघटनांचा आरोप आहे. 

डाळींवर मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व असून कच्च्या मालाची मर्यादेबाहेर साठवणूक करून जास्त दरात विक्री करीत आहेत. या कंपन्यांवर राज्य सरकारने छापे टाकावेत आणि अवैध साठा बाजारात विक्रीस आणावा, अशी व्यापारी संघटनांची मागणी आहे.

केवळ लहान व्यापाऱ्यांना स्टॉकची सक्ती

ग्राहकांना किफायत दरात डाळ मिळावी म्हणून सरकारने लहान व्यापाऱ्यांना पोर्टलवर स्टॉकची माहिती देण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे डाळींचा मर्यादेबाहेर स्टॉक करणाऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांवर कुठलीही कारवाई करीत नसल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. डाळींच्या वाढत्या दरामुळे राज्य सरकार व्यापाऱ्यांचे गोडाऊन, कोल्ड स्टोरेज आणि दाल मिलर्सच्या स्टॉकवर लक्ष ठेवून आहे. दुसरीकडे मोठ्या कंपन्या डाळींची मनमानी किंमत वसूल करीत असल्यानंतरही त्यांच्यावर नियंत्रण नाही. यावरून या कंपन्यांना सरकारने भाव वाढविण्याची सूट दिल्याचे दिसून येते. त्यांच्या स्टॉक रजिस्टरची तपासणी आणि जप्ती होत नाहीच. ही बाब चुकीची असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.घाऊकमध्ये भाव कमी, किरकोळमध्ये जास्त तूर डाळ दर्जानुसार विकली जाते. ठोक बाजारात भाव १२५ रुपये किलो आहे. या कंपन्यांद्वारे मॉलमध्ये १५० रुपये वसूल केले जात आहेत. किरकोळमध्ये भाव १३० ते १४५ रुपये आहेत. त्यानंतरही लोकांच्या ताटातून डाळ गायब आहे.

मोठ्या कंपन्यांच्या स्टॉकची तपासणी करावी

होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी म्हणाले, बाजारात कायदा केवळ लहान व्यापाऱ्यांसाठीच असल्याचे दिसून येते. मोठ्या कंपन्यांना लुटण्याची खुली सूट दिली आहे. सध्या मोठ्या कंपन्यांनी धान्याच्या बाजारावर कब्जा मिळविला आहे. मोठ्या कंपन्यांच्या भावावर सरकारचे नियंत्रण नाही. ते हवी तशी किंमत ग्राहकांकडून वसूल करतात. सरकार केवळ लहान व्यापाऱ्यांवर बळजबरी करून स्टॉक मर्यादेची तपासणी करीत आहे. सरकारला खरंच स्टॉकची तपासणी करायची असेल तर आधी मोठ्या कंपन्यांची करावी. त्यानंतरच डाळीच्या किमती नियंत्रणात येतील. लहान व्यापाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात आणून त्रास दिला जात आहे. त्याचा फायदा मोठ्या कंपन्या उचलत आहेत.

मोठ्या कंपन्या थेट शेतातून विकत घेतात माल

मोठ्या कंपन्या कच्चा आणि प्रोसेस माल थेट शेतकऱ्यांकडून विकत घेतात. कंपन्या स्वस्त आणि मोठ्या प्रमाणात शेतमाल घेऊन स्टॉक करतात. मोठ्या कंपन्यांचे संपूर्ण भारतात स्टोरेज आहेत. हा प्रकार उघड्या डोळ्याने दिसत असतानाही सरकार या कंपन्यांवर नियंत्रण आणण्याचा कुठलाही प्रयत्न करीत नाहीत. या कंपन्यांच्या स्टॉकची सक्तीने तपासणी करावी. वेळेप्रसंगी छापेही टाकावेत, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर