शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुद्ध कायदेशीर कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 18:12 IST

Nagpur : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओटीएसअंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जफेड करूनही ज्या बँकांनी त्यांना पीककर्ज दिले नाही त्या बँकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार डॉ. आशिष देशमुख, नागपूर सुधार प्रन्यासचे प्रन्य सभापती संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, प्रभारी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, प्रभारी पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, माजी आमदार सुधीर पारवे, अग्रणी बँक व्यवस्थापक मोहित गेडाम उपस्थित होते.

शेतकऱ्यांवर पीक कर्जाबाबत कुठलाही अन्याय होऊ नये यासाठी प्रत्येक तालुक्याला उपविभागीय दंडाधिकारी, अग्रणी बँक व्यवस्थापक यांनीही वेळोवेळी बैंक व्यवस्थापकांना बोलावून रीतसर आढावा घ्यावा, असे निर्देशही बावनकुळे यांनी दिले.

माफसूच्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशीअंबाझरी तलावाच्या लगतच जागा माफसूची आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अतिक्रमण झाले. कारवाई केल्यानंतर अतिक्रमणधारक न्यायालयात जातात. तेव्हा आपली बाजू भक्कमपणे न मांडल्यामुळे अतिक्रमणधारकांना दिलासा मिळतो. यात जर हलगर्जीपणा झाला असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विद्यापीठातील संबंधित अभियंते, रजिस्ट्रार व जे दोषी असतील त्यांची विभागीय चौकशी लावून कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.

नाल्यांवरील अतिक्रमणे तत्काळ हटवामहसूल विभागाच्या अंतर्गत असलेल्या नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, स्थानिक महसूल अधिकारी, विकास प्राधिकरण, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी आपापल्या भागातील नाल्यांची तपासणी करावी व त्यावरील अतिक्रमणे काढावी, असे निर्देशही महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले. 

अवैध गौण खनिज वाहन चालकांवर कठोर कारवाईसाठी लवकरच निर्णयअवैध गौण खनिजांची वाहतूक करणारे वाहनचालक अनेक वेळा वाहने सरळ महसुली कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतेल अशा पद्धतीने अंगावर घालतात. ही वाहने अत्यंत बेदरकारपणे अधिक वेगात चालवितात. याला आळा घालण्यासाठी असलेल्या कलमांव्यतिरिक्त भारतीय दंडसंहिता २०२३ कलम १०९ नुसार गुन्हे दाखल करावीत. गत तीन वर्षांत ज्या वाहनांवर अवैध गौण खनिज वाहतूक कारवाई केली आहे, अशा वाहनांचे नंबर व यादी तयार करण्याचे निर्देश त्यांनी पोलिस विभागाला दिले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेCrop Loanपीक कर्जnagpurनागपूरFarmerशेतकरी