शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

कन्हान नदीत पुन्हा राख; नागपूरकरांनो तुमच्या घरी येतेय, खापरखेडा केंद्रातील राखेचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 14:51 IST

राखेचे प्रमाण अधिक वाढल्यास जलशुद्धीकरण केंद्राचे काम थांबवावे लागेल आणि त्याचा परिणाम उत्तर आणि दक्षिण नागपूरच्या पाणीपुरवठ्यावर हाेणार असल्याचे ओसीडब्ल्यूने स्पष्ट केले आहे.

नागपूर : वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांनी जणू नागपूरकरांना राखमिश्रित पाणी पाजून आराेग्य धाेक्यात घालण्याचा चंगच बांधलेला दिसताे आहे. खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या वारेगाव ॲशपाॅण्डमधून लिकेज हाेत असलेली राख काेलार नदीवाटे पुन्हा कन्हान नदीत आली आहे. रविवारी कन्हानच्या ट्रीटमेंट प्लॅन्टजवळ ही राख दिसून आली. त्यामुळे नागपूरच्या काही भागातील पाणीपुरवठा बाधित हाेण्याची शक्यता ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

खापरखेडा वीज केंद्रातून निघणारी राख वारेगाव ॲशपाॅण्डमध्ये जमा केली जाते. गेल्या दाेन दिवसांपासून पाऊस वाढल्याने वारेगाच्या ओव्हरफ्लाे पाॅइंटवरून हे राखमिश्रित पाणी काेलार नदीत वाहत जात आहे. ही नदी पुढे कन्हान नदीला भेट असल्याने राखेचे पाणी कन्हानमध्ये मिसळत आहे. रविवारी कन्हान नदीवरील जलशुद्धीकरण केंद्राच्या विहिरीजवळ ही राख दिसून आली. राखेचे प्रमाण अधिक वाढल्यास जलशुद्धीकरण केंद्राचे काम थांबवावे लागेल आणि त्याचा परिणाम उत्तर आणि दक्षिण नागपूरच्या पाणीपुरवठ्यावर हाेणार असल्याचे ओसीडब्ल्यूने स्पष्ट केले आहे.

दरम्यान सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या एनजीओने अधिक सर्वेक्षण केले असता वारेगाव ॲशपाॅण्डच्या बंधाऱ्यात तीन ठिकाणी लिकेज असल्याचे दिसून आले. केटीपीएसच्या ॲशपाॅण्डची पाइपलाइन व एअर व्हाॅल्व्हमधून लिकेज हाेत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा गंभीर प्रकार हाेत असताना खापरखेडा प्रकल्प प्रशासनाचा बेजबाबदारपणा कायम आहे. सीएफएसडीच्या कार्यकर्त्यांनी तीन ठिकाणचे लिकेज नमूद केले आहेत.

  • सुरादेवीजवळ फ्लायॲश पाइपलाइन लिकेज हाेत राखमिश्रित पाणी काेलार नदीत मिसळत आहे.
  • वारेगावच्या नवीन पंप हाऊसजवळही लिकेज दिसून आले. राख बंधाऱ्यातून ओव्हरफ्लो पाणी सेडिमेंट टँकमध्ये गाेळा करून केटीपीएसमध्ये पुन्हा वापरण्यासाठी रिसायकल व पंप करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने हे केवळ अर्धवट आणि मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो हाेत असलेली राख मुक्तपणे कोलार प्रवाहात वाहते.
  • एनडीआरएफची बांधकाम साइट : वारेगाव ते खैरीदरम्यानचा रस्ता, राखेची पाइपलाइन कोलार नदीच्या पुलावरून जाते. पुलावर आणि रस्त्यावर अनेक ठिकाणी पाइपलाइन लीक होत असून बाहेर पडलेली राख कोलार नदीत वाहत आहे.

 

राखेचे आरोग्यावर गंभीर परिणाम

वीज केंद्राच्या  राखेमध्ये मर्क्युरी, कॅडमियम, अर्सेनिक, शिसे यांसारखी घातक रसायने असतात. कोळशाची राख धोकादायक आहे. पाण्यात मिसळल्यास अल्पकालीन संपर्कामुळे नाक, घसा, डोळ्यात जळजळ, चक्कर येणे, मळमळ, उलट्या आणि श्वास लागणे असा त्रास होऊ शकतो. दीर्घकाळापर्यंत संपर्कामुळे यकृताचे नुकसान, मूत्रपिंडाचे नुकसान, ह्रदयाचे आजार आणि विविध प्रकारचे कर्करोग होऊ शकतात.

टॅग्स :pollutionप्रदूषणWaterपाणीnagpurनागपूर