शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
5
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
6
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
7
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
8
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
9
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
10
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
11
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
12
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
13
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
17
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
18
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
19
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
20
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवानांना अखेरची सलामी

By admin | Updated: May 13, 2014 00:25 IST

रविवारी मुरमुरी ते जागना गावादरम्यान पोर नदीच्या पुलावर भूसुरूंग स्फोट घडवून पोलिसांचे वाहन नक्षलवाद्यांनी उडवून दिले. या घटनेत सात पोलीस जवान शहीद झाले.

ंगडचिरोली : रविवारी मुरमुरी ते जागना गावादरम्यान पोर नदीच्या पुलावर भूसुरूंग स्फोट घडवून पोलिसांचे वाहन नक्षलवाद्यांनी उडवून दिले. या घटनेत सात पोलीस जवान शहीद झाले. सातही शहीद पोलीस जवानांना सोमवारी सकाळी ८.३0 वाजता येथील पोलीस कवायत मैदानावर भावपूर्ण वातावरणात अखेरची सलामी देण्यात आली.

पोलीस प्रशासनाच्यावतीने २१ बंदुकींच्या तीनदा हवेत फैरी झाडून शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्यासह पोलीस अधिकार्‍यांनी सांत्वन केले. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल, सहाय्यक महासंचालक रश्मी शुक्ला, माजी आमदार अशोक नेते, नागपूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनुपकुमार सिंग, पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकुमार मिना, राजकुमार शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना भावपूर्ण o्रद्धांजली अर्पण केली. तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडंट एस. के. सिंग, मारूती जगताप, देसाईगंजचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल खाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर, देवेंद्रसिंग, नायब तहसीलदार सी. जी. पित्तुलवार यांनी सुद्धा शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून o्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी शहीदांचे कुटुंबीय व नातेवाईकांच्या आक्रोशाने उपस्थितांचे हृदय हेलावले. सार्‍यांचेच डोळे अo्रूने पाणावले होते. गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मानवंदनेनंतर पोलीस विभागाने शहिदांचे पार्थीव त्यांच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द केले. वाहनाने शहिदांचे पार्थीव व त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मुळगावी सर्व शहिदांवर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.