शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरच्या काळ्याबाजारात मोठे रॅकेट सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांमध्ये एक मोठे रॅकेटच सक्रिय असल्याचा संशय असून त्यात आणखी काही डॉक्टर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांमध्ये एक मोठे रॅकेटच सक्रिय असल्याचा संशय असून त्यात आणखी काही डॉक्टर आणि विविध हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा दाट संशय आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी शुक्रवारी आणखी एका डॉक्टरसह वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांची कसून चाैकशी केली. दुसरीकडे काळाबाजार करताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या चारही आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा पाच दिवसांचा पीसीआर मिळवला.

नागपूरच नव्हे तर राज्यात कोरोनाचा अक्षरश: उद्रेक झाला आहे. त्यांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. त्यात प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची मानसिकता बाळगणाऱ्या काही उलट्या काळजाच्या मंडळींनी रेमडेसिविरचे ब्लॅकमार्केटिंग चालवले आहे. कोरोनाबाधितांना रुग्णालयात लावण्यासाठी आणलेल्या इंजेक्शनची १५ ते २५ हजारांत विक्री करण्याचा प्रचंड संतापजनक प्रकार या भामट्यांनी सुरू केला आहे. हे इंजेक्शन विकत घेण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक जीवाचा आटापिटा करीत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून नागपुरात सुरू असलेल्या या प्रकाराची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गंभीर दखल घेऊन रेमडेसिविरचे ब्लॅकमार्केटिंग करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश शहर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी सापळा रचला. त्यांनी डमी ग्राहक बनवून आरोपींशी संपर्क साधला आणि गुरुवारी सायंकाळी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून रेमडेसिविर विकणारा डॉ. लोकेश शाहू आशा (आशा हॉस्पिटल, कामठी), वाॅर्डबॉय शुभम मोहदुरे आणि कुणाल कोहळे (स्वस्थम हॉस्पिटल, वर्धा रोड) आणि सुमीत बागडे (दत्ता मेघे हॉस्पिटल, वानाडोंगरी) या चाैघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून १५ इंजेक्शन जप्त केले. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करून त्यांचा पाच दिवसांचा पीसीआर मिळवला. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत उपायुक्त नीलोत्पल यांनी स्वत:च चाैकशीची सूत्रे हातात घेतली आहे. अटकेतील आरोपींकडून शुक्रवारी मोठी रक्कम जप्त केली. त्याबाबतचा खुलासा तूर्त करणे योग्य नसल्याचे उपायुक्त नीलोत्पल म्हणाले. आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी एका डॉक्टरसह कामठी आणि नागपुरातील आणखी चार हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची चाैकशी केली. रेमडेसिविरच्या काळ्याबाजारात या हॉस्पिटलचीही भूमिका काय आहे, त्याचीही आम्ही चौकशी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. काळाबाजार करणाऱ्या या रॅकेटचे धागेदोरे बाहेर जिल्ह्याशीही जुळले असल्याचा संशय असल्यामुळे पुढच्या काही तासांत धक्कादायक घडामोडींचे संकेत पोलिसांकडून मिळाले आहेत.

---

ते इंजेक्शन मृत रुग्णांचे?

हॉस्पिटलमध्ये ज्या रुग्णांचा मृत्यू व्हायचा, त्याच्या जवळचे इंजेक्शन लंपास करून आम्ही ते विकत होतो, अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे. या माहितीची पोलिसांकडून शहानिशा केली जात आहे.

---