देशातील १४ विमानतळांवर ‘लँडिंग’ धोक्यात, ‘लेझर’चा अडथळा

By योगेश पांडे | Updated: January 30, 2026 07:18 IST2026-01-30T07:17:50+5:302026-01-30T07:18:16+5:30

Airplane News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर विमानतळांवरील आयएलएस प्रणालीचा मुद्दा चर्चेत आला. अनेक विमानतळांवर लँडिंगवेळी वैमानिकांना ‘लेझर बीम्स’चा अडथळा जाणवतो व त्यातून त्यांचे लक्ष विचलित होऊन मोठ्या अपघाताचा धोका असतो. वर्षभरात देशातील ४० विमानतळांवर असे प्रकार घडले आहेत. 

Landings at 14 airports in the country in danger, laser obstacle | देशातील १४ विमानतळांवर ‘लँडिंग’ धोक्यात, ‘लेझर’चा अडथळा

देशातील १४ विमानतळांवर ‘लँडिंग’ धोक्यात, ‘लेझर’चा अडथळा

- योगेश पांडे
नागपूर  - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर विमानतळांवरील आयएलएस प्रणालीचा मुद्दा चर्चेत आला. अनेक विमानतळांवर लँडिंगवेळी वैमानिकांना ‘लेझर बीम्स’चा अडथळा जाणवतो व त्यातून त्यांचे लक्ष विचलित होऊन मोठ्या अपघाताचा धोका असतो. वर्षभरात देशातील ४० विमानतळांवर असे प्रकार घडले आहेत.

डीजीसीएच्या नियमावलीनुसार विमानतळांच्या परिसरात लेझर बीम वापरण्यास मनाई आहे. विमानतळांच्या आजूबाजूला लेझर बीमपासून संरक्षणासाठी ‘प्रोटेक्टेड झोन’ निश्चित करण्यात येतात. मात्र, अनेकदा  वैमानिकांना बिम लाइटचा नकारात्मक अनुभव आला आहे.  कार्यक्रमांसाठी अनेक आयोजक आकाशाच्या दिशेने बिम लाइटचा वापर करतात. यामुळे वैमानिकांचे डोळे दीपून दुर्घटना होण्याची शक्यता असते. 

निर्देशांना वाटाण्याच्या अक्षता : नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वर्षभरात दोन घटनांची नोंद झाली. पोलिसांनी ‘लेझर बीम’बाबत निर्देश जारी केले आहेत. नागपूर विमानतळाच्या १५ किलोमीटर परिसरात सायं. ६ ते सकाळी ६ या वेळेत प्रखर लाइट आकाशात सोडू नये, असे आदेश आहेत. मात्र, हे आदेश केवळ कागदांवरच आहेत.

‘लेझर बीम’च्या घटना
विमानतळ     घटना
दिल्ली     १०५
जयपूर     ५६
चेन्नई     ५४
कोलकाता     ४४
हैदराबाद     ४१
मुंबई     ३३
लखनऊ     २६
अहमदाबाद     १७
आगरतळा     १७
भोपाळ     १६
वाराणसी    १०

Web Title : लेजर बीम से भारत के 14 हवाई अड्डों पर लैंडिंग खतरे में।

Web Summary : भारत में हवाई अड्डों पर लैंडिंग के दौरान लेजर बीम पायलटों को बाधित करती हैं, जिससे ध्यान भटकता है और दुर्घटनाओं की आशंका बढ़ जाती है। नियमों के बावजूद, दिल्ली जैसे प्रमुख हवाई अड्डों के पास घटनाएं जारी हैं, जिससे सुरक्षा संबंधी चिंताएँ बढ़ रही हैं।

Web Title : Laser beams endanger landings at 14 Indian airports.

Web Summary : Laser beams obstruct pilots during landings at Indian airports, causing distractions and potential accidents. Despite regulations, incidents persist, especially near major airports like Delhi, creating significant safety concerns.