महिनाभरात १०० 'चार्टर्ड फ्लाइट'चे लँडिंग; पूर्वीच्या तुलनेत वाढतेय विमानांची संख्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 17:06 IST2022-12-26T17:04:20+5:302022-12-26T17:06:27+5:30
कोरोनामुळे या विमानांच्या संख्येत वाढ

महिनाभरात १०० 'चार्टर्ड फ्लाइट'चे लँडिंग; पूर्वीच्या तुलनेत वाढतेय विमानांची संख्या
नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वर्षांपूर्वीपर्यंत वर्षभरात जेवढे चार्टर्ड विमान पोहोचत होते, तेवढे विमान या वर्षी डिसेंबर महिन्यात पोहोचत आहेत. कोरोनामुळे या विमानांच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन वर्षांनंतर नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात अनेक व्हीआयपी चार्टर्ड विमानांनी उपराजधानीत येत आहेत, याशिवाय काही इतर चार्टर्ड विमानांचे संचालनही झाले आहे. सूत्रांनुसार डिसेंबर महिन्यात आतापर्यंत १०० चार्टर्ड विमानांची ये-जा झाली आहे. हे विमान लहान असले, तरी यात व्हीआयपी व्यक्ती असतात. या कारणामुळे विमानतळावर पूर्वीच्या तुलनेत गर्दी पाहावयास मिळत आहे. आपल्या नेत्याला घेण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे. सध्या राष्ट्रीय व्यावसायिक विमान व चार्टर्ड विमानातील प्रवाशांना कोरोनाच्या रँडम टेस्टिंगची गरज नाही, परंतु सूत्रांनुसार नेत्यांसाठी गोळा होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या कमी करण्यासाठी लवकरच प्रयत्न होऊ शकतो.
‘नव्या निर्देशांनुसार आंतरराष्ट्रीय विमानांच्या २ टक्के प्रवाशांची रँडम कोरोना तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक विमानतळावर तैनात करण्यात आले आहे. २४ व २५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाला येथे तपासणीसाठी तैनात करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी झालेल्या तपासणीत कोणत्याही प्रवाशाला कोरोना असल्याचे आढळले नाही.’
- डॉ.नरेंद्र बहिरवार, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका.