शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या वादात भूखंडधारकांचा निवारा उध्वस्त

By admin | Updated: January 3, 2017 22:30 IST

विकासकासोबत (डेव्हलपर्स) केलेला जमिनीचा सौदा वांद्यात आल्याचे सांगून जमिन मालकाने सशस्त्र गुंडांच्या साथीने सोमवारी अनेकांचे निवारे उध्वस्त केले.

ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 3 -   विकासकासोबत (डेव्हलपर्स) केलेला जमिनीचा सौदा वांद्यात आल्याचे सांगून जमिन मालकाने सशस्त्र गुंडांच्या साथीने सोमवारी अनेकांचे निवारे उध्वस्त केले. दरम्यान, पैसे देऊन भूखंड घेतल्यानंतर त्यावर उभारलेले घर डोळ्यादेखत पाडले गेल्यामुळे गेल्या ददोन दिवसांपासून संबंधितांचा आक्रोश सुरू आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राम बहादुरा शिवार आहे. येथील तीन एकर जमिन सतीश सहारे नामक डेव्हलपर्सला नांदूरकर बंधूंनी २ वर्षांपूर्वी विकली होती. एक ते दीड कोटीच्या या खरेदी - विक्रीतील ३० लाख रुपये प्रारंभी सहारे यांनी जमिन मालक नांदूरकर बंधूंना दिले. त्यानंतरही काही रक्कम सहारेने जमिनमालकांना दिल्याचे सांगितले जाते. दरम्यान, कागदोपत्री परवानगी घेऊन सहारेने तेथे वेगवेगळ्या क्षेत्रफळात भूखंड टाकले. त्याची वेगवेगळ्या किंमतीत अनेकांना विक्रीही केली. भूखंड विकत घेणारांनी परिस्थितीप्रमाणे आपला निवारा बांधला. अनेकांनी चांगले पक्के घरेही बांधली. दरम्यान, जमिनमालक आणि भूखंड धारकामधील कडी असलेल्या सहारेचा मृत्यू झाला. परिणामी ठरलेल्या सौद्यातील उर्वरित रक्कम मिळाली नाही म्हणून जमिन मालकांनी आपली रक्कम मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले. पोलिसांच्या माहितीनुसार, नंतर हा वाद कोर्टातही गेला. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अचानक सोमवारी दुपारी ४ वाजता १५ ते २० सशस्त्र गुंड घेऊन विश्वनाथ बालाजी नांदुरकर, एकनाथ बालाजी नांदुरकर आणि राजेश्वर बालाजी नांदुरकर (तिघेही रा. चिटणीसनगर) जमिनीवर पोहचले. सोबत त्यांनी जेसीबीही नेला होता. त्यांनी अनेकांच्या घरावर जेसीबी चालवला. विरोध करणा-यांना नांदुरकर यांच्या सोबत असलेल्यांनी शिवीगाळ आणि मारहाण केली. तब्बल दोन ते तीन तास हा हैदोस सुरू होता. डोळ्यादेखत आपले घर उध्वस्त केले जात असल्याचे पाहून संबंधितांचा आक्रोश सुरू झाला. महेश पांडुरंगजी बारापात्रे (वय ४०, रा. नाईकवाडी, पाचपावली) यांच्यासह काहींनी गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची तक्रार बारापात्रे यांनी सक्करदरा ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी नांदूरकर बंधंूना सोमवारी रात्री तर प्रशांत अनिल नखाते (वय ३०, रा. साईबाबानगर, खरबी) आणि सतीश विनोद कांबळे (वय २७, रा. वाठोडा) या दोघांना मंगळवारी सायंकाळी अटक केली. पोलिसांची भूमिका संशयास्पद आरोपींनी निवारा उध्वस्त केल्यामुळे अनेकांना कडाक्याच्या थंडीत उघड्यावर राहणे भाग पडले आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमीका संशयस्पद असल्याचा पीडितांचा आरोप आहे. पोलीस उपायुक्त जी. श्रीधर यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी आरोपींवर कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर मंगळवारी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी धावपळ केली. मात्र, दिवसभरात केवळ दोनच आरोपी पोलिसांच्या हाती लागले. अन्य आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस ठाण्यातून सांगितले जात होते.