शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

श्रम प्रतिष्ठा दिवस; श्रमावरून विषमता, कशी मिळेल प्रतिष्ठा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:27 AM

अस्पृश्यता हा भारताला लागलेला कलंक आहेच. परंतु स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही भारतात ना अस्पृश्यता पूर्णपणे संपली आहे ना विषमता. आजही अनेक प्रकारची विषमता देशात पाळली जाते.

ठळक मुद्देश्रमिकांकडे पाहण्याची मानसिकता बदलाअधिकाराचा वापरच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अस्पृश्यता हा भारताला लागलेला कलंक आहेच. परंतु स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही भारतात ना अस्पृश्यता पूर्णपणे संपली आहे ना विषमता. आजही अनेक प्रकारची विषमता देशात पाळली जाते. यापैकीच एक म्हणजे श्रम विषमता होय. प्रत्येक व्यक्ती कळत न कळतपणे ही विषमता जोपासते, पाळते. आपल्यापेक्षा कमी दर्जाचे काम करणाऱ्या व्यक्तीला आपण कमी लेखतो. तेथूनच ही विषमता सुरु होते. तेव्हा ज्या देशात श्रमालाच प्रतिष्ठा नसेल तिथे श्रमिकांची काय परिस्थिती असेल? म्हणून श्रमिकांकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे.देशात तब्बल ९३ टक्के श्रमिक हे असंघटित आहेत. किंवा असंघटित क्षेत्रातील आहेत. केवळ ७ टक्के श्रमिक हे संघटित आहेत. असंघटित असलेले ९३ टक्के श्रमिक हे नवनिर्माणाचे काम करतात. उदाहरणार्थ बांधकाम क्षेत्रातील कामगार हे नवीन इमारती उभारतात. विणकर धाग्यापासून कापड तयार करतो, शेतकरी बियापासून धान्य निर्माण करतो. कारखान्यात काम करणारे मजूरही नवीन निर्माण करीत असतात. त्यामुळे देशाच्या विकासात यांचे महत्त्वाचे योगदान आहे. इतकेच नव्हे तर घरकाम करणारी मोलकरीणीचीही सुद्धा महत्वाची भूमिका आहे. कारण घरकाम करणारी मोलकरीण आहे म्हणून नोकरदार आपले काम व्यवस्थितपणे करू शकतात. एक दिवस मोलकरीण आली नाही, तर कामावर जायला उशीर होतो, असा अनुभव आहे. एकूण देश घडवण्यात या ९३ टक्के असंघिटत श्रमिकांचाही मोलाचा वाटा आहे. परंतु राष्ट्रीय उत्पन्नात त्यांच्या श्रमाला कुठलेही स्थान नाही. त्यांच्यासाठी वेज बोर्ड नाही. किमान वेतन आहे परंतु कंत्राटदार पद्धतीत ते वेतनही त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांची दैनावस्था झाली आहे.यातच मोलकरीणपासून तर ड्रायव्हरपर्यंत आणि मजुरापासून तर शेतकºयांपर्यंतच्या श्रमिकांकडे समाजाची पाहण्याची दृष्टीही विषमता वाढवणारी आहे. अशा श्रमिकांसोबत साधारणपणे आपली वागणूक तुच्छपणाची असते. न कळतपणे आपण त्यांना कमी लेखत असतो. या श्रमिकांच्या श्रमाकडे महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी यांनी प्रतिष्ठेने पाहिले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना संविधानिक अधिकार बहाल केले आहे. परंतु आपली त्यांच्याकडे पाहण्याची ही दृष्टी बदलत नाही, तोपर्यंत त्यांच्या श्रमाला व त्यांना खºया अर्थाने प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही.

महिलांच्या श्रमाकडे सर्वाधिक दुर्लक्षअसंघटित क्षेत्रातील सर्वच श्रमिक तसे पीडित आहेत. परंतु यातही महिला श्रमिकांवर सर्वाधिक अन्याय होत असतो. त्यांना मजुरी पुरुषांपेक्षा कमी दिली जाते. घरी राहणारी महिला ही दिवसभर राबत असते. परंतु तिच्या कामालाही प्रतिष्ठा नाही. तिच्या कामाला कर्तव्य असल्याचे सांगून तिच्या श्रमाकडेही समाज दुर्लक्ष करतो, ही सुद्धा विषमताच असून समाजाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.-विलास भोंगाडे, कामगार नेते

टॅग्स :Socialसामाजिक