मेडिसीन, बधिरीकरण डॉक्टरांवरच कोविडचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 01:13 AM2020-05-22T01:13:33+5:302020-05-22T01:19:39+5:30

‘कोविड-१९’ रुग्णांवर उपचार करणे, त्यांची नोंद ठेवणे, ऑनलाईन माहिती भरणे, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे आदी कामांचा ताण औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन) व बधिरीकरणशास्त्र विभागाच्या डॉक्टरांवर पडला आहे. यात इतर विभागातील डॉक्टर मदत करीत नसल्याची बाब समोर आली आहे. अशा डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची रुग्णसेवेत हजेरी लावण्याची व जे हजर राहणार नाहीत किंवा कामचुकारपणा करतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश शासनाने सर्व अधिष्ठात्यांना दिले आहेत.

Kovid's stress only on medicine, deafness doctors | मेडिसीन, बधिरीकरण डॉक्टरांवरच कोविडचा ताण

मेडिसीन, बधिरीकरण डॉक्टरांवरच कोविडचा ताण

Next
ठळक मुद्देइतरही डॉक्टरांना सहभागी करून घेण्याचे निर्देश : कामचुकारपणा करणाऱ्या डॉक्टरांवर शिस्तभंगाची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ‘कोविड-१९’ रुग्णांवर उपचार करणे, त्यांची नोंद ठेवणे, ऑनलाईन माहिती भरणे, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे आदी कामांचा ताण औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन) व बधिरीकरणशास्त्र विभागाच्या डॉक्टरांवर पडला आहे. यात इतर विभागातील डॉक्टर मदत करीत नसल्याची बाब समोर आली आहे. अशा डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची रुग्णसेवेत हजेरी लावण्याची व जे हजर राहणार नाहीत किंवा कामचुकारपणा करतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश शासनाने सर्व अधिष्ठात्यांना दिले आहेत.
राज्यात वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. परंतु या रुग्णांवर औषधोपचार करण्याची जबाबदारी केवळ मुख्यत्वे मेडिसीन व बधिरीकरण विभागाच्या डॉक्टरांवरच आहे. यामुळे यांच्यावर कामाचा मोठा ताण पडला आहे. या कार्यात इतर विभागासोबतच अचिकित्सालयीन विभागातील डॉक्टर मदत करीत नसल्याचे व जबाबदारी देऊनही हात वर करीत असल्याचा प्रकार सामोर आला आहे. विशेष म्हणजे, कोविडच्या पार्श्वभूमीवर विशेषत: अचिकित्सालयीन विभागातील डॉक्टरांना कामच नाही. सकाळी ११ वाजता येऊन दुपारी २ वाजता घरी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याच्या तक्रारी झाल्याने शासनाने याची स्वत: दखल घेतली. १९ मे रोजी परिपत्रक काढले. यात मेडिसीन व बधिरीकरणशास्त्र विभागातील डॉक्टर वगळता सर्व विभागातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी दररोज कर्तव्यावर हजर राहण्याचे व अधिष्ठात्यांनी नेमून दिलेली कामे करण्याचे निर्देशा दिले. जे डॉक्टर व कर्मचारी कर्तव्यावर हजर राहणार नाहीत किंवा कामचुकारपणा करतील त्यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात कसूर केल्यामुळे शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल. तसेच अनुपस्थित राहणारे डॉक्टर व कर्मचारी हे साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदानुसार दंडनीय कारवाईस पात्र राहतील, असेही शासन परिपत्रकात म्हटले आहे.

Web Title: Kovid's stress only on medicine, deafness doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.