शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

वंचित घटकांना केंद्रस्थानी ठेवून निर्णय घ्यावेत

By admin | Updated: January 7, 2017 02:46 IST

आयकर अधिकाऱ्यांनी समाजातील वंचित घटकांना केंद्रस्थानी ठेवून योग्य निर्णय घ्यावेत,

संतोषकुमार गंगवार : एनएडीटीमध्ये आयआरएस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण नागपूर : आयकर अधिकाऱ्यांनी समाजातील वंचित घटकांना केंद्रस्थानी ठेवून योग्य निर्णय घ्यावेत, असे आवाहन केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी येथे केले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे भारतीय राजस्व सेवेच्या (आयआरएस) ७० व्या तुकडीच्या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या वेळी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या सदस्या निशी सिंह, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे प्रधान महासंचालक रंगनाथ झा उपस्थित होते. गंगवार म्हणाले, शासकीय आयकर विभागाशी संबंधित तक्रारी कमीच असतात. आयकर विभागाच्या कार्यपद्धतीमध्ये आधुनिकीकरणामुळे परिवर्तन घडत आहे. कर संकलनात आयकर विभाग महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे काळ्या पैशाच्या मुक्तीचा लढा केंद्र सरकारने उभारला आहे. वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर कर संकलनामध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रत्यक्ष कर संकलनामध्ये आयकराचा वाटा ७ ते ८ टक्के होता, तो आता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, या कर संकलनात वस्तू व सेवा कर लागू झाल्यावर ८ लक्ष कोटीची भर पडणार आहे. कर संकलनाच्या खर्चासाठी आयकर विभाग एक टक्क्यापेक्षा कमी निधी वापरतो. येणाऱ्या काळात विभागाचे कार्यक्षेत्र अजून विस्तारेल, असे त्यांनी नमूद केले. निशी सिंह म्हणाल्या, कर संकलनाची जबाबदारी ही कठीण असून अधिकाऱ्यांनी करदाते, सहकारी व सामान्य जनता यांच्याशी न्यायबुद्धीने वागावे. रंगनाथ झा यांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये कर प्रशासनाचे प्रशिक्षण देणे, हे राष्ट्रीय विकासाचे कार्य असल्याचे सांगितले. प्रशिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संपूर्ण उत्तरदायित्वानिशी अधिकाऱ्यांनी सहभाग घ्यावा. प्रशिक्षण अभ्यासक्रम संचालक संजय धारीवाल यांनी ७० व्या भारतीय राजस्व सेवेतील तुकडीचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला. या तुकडीची एकूण संख्या १६८ असून २ अधिकारी रॉयल भूटान सेवेतून आले आहेत. तुकडीचे सरासरी वय २८ वर्ष असून सर्वात तरुण वयाचे अधिकारी २३ वर्षांचे तर ३७ वर्ष वयाचे अधिकारीही या तुकडीत आहेत. २६ टक्के महिला या तुकडीत समाविष्ट असून सर्वात जास्त ३२ अधिकारी उत्तर प्रदेशातील आहेत. ५४ टक्के अधिकारी अभियंते असून २० टक्के मानव्यशास्त्र, २० अधिकारी वैद्यकीय तज्ज्ञ, ३ अधिकारी सनदी लेखापाल आहेत. ६७ टक्के अधिकाऱ्यांना कामाचा अनुभव आहे. अतिरिक्त महासंचालक आर.के. चौबे यांनी मार्गदर्शन केले. अधिकाऱ्यांनी कर-प्रशासकाची प्रतिज्ञा घेतली. सूत्रसंचालन ६९ व्या भारतीय राजस्व सेवेतील तुकडीचे अधिकारी मेघा गर्ग यांनी तर आभार सहयोगी प्रशिक्षण संचालक अंजनी कुमार पांडे यांनी मानले. कार्यक्रमास आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ६९ व्या व ७० व्या भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)