के.सी. जॉनी नागपूर केंद्रीय जीएसटीच्या मुख्य आयुक्तपदी नियुक्त
By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 11, 2023 18:22 IST2023-10-11T18:22:30+5:302023-10-11T18:22:59+5:30
जॉनी यांच्यासोबतच देशातील अन्य दोन आयआरएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

के.सी. जॉनी नागपूर केंद्रीय जीएसटीच्या मुख्य आयुक्तपदी नियुक्त
नागपूर : नागपूर झोनच्या केंद्रीय जीएसटी आणि कस्टमच्या मुख्य आयुक्तपदी के.सी. जॉनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते नागपुरात पदोन्नतीवर येत आहेत. त्यांच्या अंतर्गत नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक विभाग येतो.
जॉनी हे १९९१ बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. त्यांच्या पदोन्नतीचा आदेश भारत सरकारचे सचिव एस.ए. अन्सारी यांनी ११ ऑक्टोबरला काढला आहे. जॉनी यांच्यासोबतच देशातील अन्य दोन आयआरएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये १९९१ बॅचचे अधिकारी ए.आर.एस. कुमार यांना चेन्नई (दक्षिण) येथे डीजीजीआय म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. तर १९९१ बॅचचे रीमहीम प्रसाद यांची वडोदरा येथे केंद्रीय जीएसटीच्या मुख्य आयुक्तपदी पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. हे आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे विभागातील कामांचा निपटारा तातडीने होण्यास मदत होईल, असे अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.