शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

काटोलकरांनी जपलं ‌‘नातं‌’ रक्ताचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST

काटाेल : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यात रक्तदात्यांची मोठी साखळी तयार होत आहे. याअंतर्गत सहभागी होत रविवारी ...

काटाेल : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यात रक्तदात्यांची मोठी साखळी तयार होत आहे. याअंतर्गत सहभागी होत रविवारी काटोलकरांनी रक्ताचं ‘नातं‌’ जपत मोहिमेला अधिक बळ देण्याचे काम केले. सक्षम फाऊंडेशन व उड्डाण फाऊंडेशन काटाेल यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद शाळा क्र. २ येथे आयाेजित रक्तदान शिबिरात शहरातील सेवाभावी संघटना, पाेलीस कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. नगराध्यक्ष वैशाली ठाकूर यांनी शिबिराचे उद्घाटन केले. काेराेनाच्या संकटकाळात रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून लाेकमतच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक याप्रसंगी ठाकूर यांनी केले. या उपक्रमाला बळ देण्याचे काम काटोल शहरातील प्रत्येक संघटनेने करावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. उपविभागीय पाेलीस अधिकारी नागेश जाधव, तहसीलदार अजय चरडे, माजी जि. प. सदस्य चंद्रशेखर काेल्हे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तारकेश्वर शेळके, संचालक अजय लाडसे, नगरसेविका शालिनी महाजन, लता कडू, वनिता रेवतकर, शालिनी बन्साेड, राष्ट्रवादी ओबीसी आघाडीचे रुपेश नाखले, नितीन वानखेडे उपस्थित हाेते. तहसीलदार चरडे यांच्या पत्नी प्रिया यांनी प्रथम रक्तदान करीत शिबिराला सुरुवात केली. या शिबिराला जाेतिबा फुले अभ्यासिका, पाेलीस ठाणे, एसटी महामंडळ कर्मचारी संघटना, युवा सेना, शिक्षक व कर्मचारी संघटना, काटाेल कंत्राटदार संघटना, जाणता राजा प्रतिष्ठान, हॅपी टू केअर व सामाजिक संघटना आदींनी सहकार्य केले. सामाजिक कार्यकर्ते राजू ठाकूर, माजी जि.प. सदस्य समीर उमप, माजी पं. स. सभापती संदीप सरोदे, नगरसेवक तानाजी थोटे, पं.स सदस्य संजय डांगोरे, कंत्राटदार कावडकर, शिवसेनेचे पदाधिकारी विपुल देवपुजारी, तिलक क्षीरसागर, लखन राऊत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी शिबिरस्थळी भेट देत रक्तदात्यांना प्रोत्साहित केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी लाेकमतचे तालुका प्रतिनिधी सौरभ ढोरे, शहर प्रतिनिधी अमोल काळे, उड्डाण फाउंडेशनचे शुभम ढोरे, अभिषेक चांडक, हॅपी टू केअरचे मयूर काळे, राहुल काळे, साहिल ढेरकर, लोचन राऊत, राहुल भोयर, श्रेयस ढोंगे, प्रफुल सातपुते, स्वप्निल बरडे, निशांत उमाठे, नकुल गुजर, भूषण गायकवाड आदींनी सहकार्य केले.

.....

शिक्षक टेकाडे यांचे ३८ वे रक्तदान

काटोल तालुक्यातील शिक्षक राजेंद्र टेकाडे यांनी ३८ व्या रक्तदान करीत लोकमतच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रक्तदानांसाठी युवकांनी पुढे येण्याची आवाहन त्यांनी केले.

.....

पोलीसदादांनी बजावले राष्ट्रीय कर्तव्य

काटोल पोलिसांच्यावतीने सहायक ठाणेदार राहुल बोंद्रे , पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार यांच्यासह इतर पोलीस बांधवानी रक्तदान करीत राष्ट्रीय कर्तव्य बजावले.