शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

कामठी नागपूरचे उपनगर म्हणून विकसित होतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 8:17 PM

कामठी शहराला नागपूरचे उपनगर म्हणून विकसित करीत असल्याने या परिसरात सक्षम वीज वितरणासह अन्य विकास कामे मोठ्या प्रमाणात होत असून याचा लाभ येथील जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे, असे उद्गार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे काढले.

ठळक मुद्देकामठीत वीज वाहिनीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कामठी ): कामठी शहराला नागपूरचे उपनगर म्हणून विकसित करीत असल्याने या परिसरात सक्षम वीज वितरणासह अन्य विकास कामे मोठ्या प्रमाणात होत असून याचा लाभ येथील जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे, असे उद्गार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे काढले.महावितरणच्या वतीने कामठी शहरात उभारण्यात आलेल्या नवीन वीज वाहिनीचे लोकार्पण आणि भाजी मंडी-कोळसा टाल या नवीन वाहिनीच्या कामाचे तसेच ड्रॅगन पॅलेस येथील येथील वीज उपकेंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या १० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राचे लोकार्पण ना. बावनकुळे यांच्या हस्ते झाले. ड्रॅगन पॅलेस वीज उपकेंद्रात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे तर कामठी नगर परिषद अध्यक्ष मो. शहाजहाँ शफाअत अन्सारी, उपाध्यक्ष मतीन खान, जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख, कामठी तालुका विद्युत नियंत्रण समितीचे अध्यक्ष मोबीन पटेल विशेष उपस्थित होते.ड्रॅगन पॅलेसमुळे कामठी शहराची जगात ओळख निर्माण झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथील वीज वितरणाचे जाळे मजबूत होत आहे. सोबतच पथदिवे आणि पाणी पुरवठ्यासाठी साधारण २ मेगा वॅट विजेची गरज भासणार आहे यासाठी नगरपालिकेने जागा दिल्यास हा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करता येईल यासाठी शासनाकडून १२ कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी यावेळी दाखवली.कामठी परिसरात भूमिगत वीज वाहिनीची कामे करतेवेळी वॉर्ड पातळीवर कामाचे नियोजन करून ती पूर्ण करण्याची सूचना ना. बावनकुळे यांनी यावेळी महावितरण अधिकारी वर्गास केली. कामठी ड्रॅगन पॅलेस येथील वीज उपकेंद्रात २० एमव्हीए क्षमतेचे २ रोहित्र उभारण्यात आल्याने परिसरास दजेर्दार वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. अशी माहिती नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी संचालक दिलीप घुगल यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. यावेळी अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा)उमेश शहारे, नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे उपस्थित होते.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे