‘कोलार’चा कालवा फुटला

By Admin | Updated: November 15, 2015 02:15 IST2015-11-15T02:15:42+5:302015-11-15T02:15:42+5:30

परिसरातील परसोडी शिवारातून कोलार प्रकल्पाचा कालवा गेला आहे. या कालव्याला भगदाड पडल्याने कालव्यातील पाणी शेतात साचले.

Kalaar's canal split | ‘कोलार’चा कालवा फुटला

‘कोलार’चा कालवा फुटला

शेतात साचले पाणी : परसोडी शिवारातील प्रकार
केळवद : परिसरातील परसोडी शिवारातून कोलार प्रकल्पाचा कालवा गेला आहे. या कालव्याला भगदाड पडल्याने कालव्यातील पाणी शेतात साचले. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
सावनेर तालुक्यातील परसोडी शिवारात कोलार प्रकल्पाच्या कालव्याला भगदाड पडले. त्यामुळे कालव्यातील संपूर्ण पाणी अनिल वसंता भेलोंडे रा. परसोडी, ता. सावनेर यांच्या शेतात साचले आहे. यावर्षी भेलोंडे यांनी कपाशी व तुरीची पेरणी केली असून, शेतात साचलेल्या कालव्याच्या पाण्यामुळे ही दोन्ही पिके सडण्याच्या मार्गावर आहे. या संदर्भात सावनेर येथील लघुसिंचन विभागातील कर्मचारी बोरकर यांनी सांगितले की, या कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. मात्र, शेतात साचलेल्या पाण्यामुळे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अनिल भेलोंडे यांनी दिली. हा प्रकर सिंचन विभागाच्या हलगर्जीपणामुळे घडला असून, नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Kalaar's canal split