शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

दोन कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर परतला आनंद

By admin | Updated: July 2, 2015 03:20 IST

शहर पोलिसांच्या प्रयत्नांमुळे उपराजधानीतील दोन कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद पुन्हा एकदा परत आला आहे.

‘आॅपरेशन मुस्कान’चा पहिला दिवस नागपूर : शहर पोलिसांच्या प्रयत्नांमुळे उपराजधानीतील दोन कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद पुन्हा एकदा परत आला आहे. पोलिसांनी ‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत बेपत्ता झालेल्या दोन मुलींसह चार अल्पवयीन मुलांना शोधून काढले आहे. तसेच १९ अल्पवयीनांची माहिती एकत्र केली आहे. शहर पोलिसांतर्फे १ ते ३१ जुलै दरम्यान ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविले जात आहे. या दरम्यान गेल्या तीन वर्षात शहरातून बेपत्ता झालेल्या २८५ अल्पवयीनांना शोधून काढण्यात येणार आहे. जरीपटका येथील एक तरुणी २४ जून रोजी घरून अचानक बेपत्ता होऊन अमरावतीला पोहोचली होती. पोलिसांनी या तरुणीला शोधून काढले आहे. त्याचप्रकारे एक दुसरी तरुणीसुद्धा २० जून रोजी आपल्या मैत्रिणीसोबत वर्धेला गेली होती. ती वर्धेत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वर्धेत पोलिसांची चमू पाठविली. तेथून तरुणीला आणण्यात आले. दोघींनाही त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. जरीपटका येथील मूकबधिर वसतिगृहातून १८ जून रोजी ६ वर्षाचा मूकबधिर मुलगा अचानक निघून गेला होता. तो नागरिकांना नारा परिसरात फिरतांना आढळून आला. नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी त्याला वसतिगृहात पाठविले. जरीपटका येथील १४ वर्षीय मुलगा सोमवारी कामठी रोडने ड्रॅगन पॅलेस फिरायला गेला होता. परंतु तो परतलाच नाही. तो भटकून कामठीला निघून गेला होता. मात्र तो स्वत:च घरी आला. त्याचप्रकारे एलआयसी चौकात ६, यशवंत स्टेडियम परिसरातील १३ अल्पवयीन मुलांची माहिती घेण्यात आली आहे. या मुलांचे छायाचित्र, त्यांच्या आईवडिलांचे नाव व इतर माहिती घेण्यात आली आहे. संशयास्पद माहिती मिळाल्यास कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पोलिसांनी मुलांच्या बेपत्ता होण्यासंबंधीची माहिती हेल्पलाईन क्रमांक ०७१२-२५२०६९९ आणि टोल फ्री क्रमांक १०९८ यावर देण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)