ऑटोतून दोन लाखाचे दागिने लंपास, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
By दयानंद पाईकराव | Updated: June 17, 2023 17:26 IST2023-06-17T17:25:06+5:302023-06-17T17:26:26+5:30
ऑटोचालकास भेटून बॅगबाबत विचारपुस केली असता त्याने आपणास काहीच माहिती नसल्याचे सांगितले.

ऑटोतून दोन लाखाचे दागिने लंपास, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : ऑटोतून दोन लाखाचे दागिने लंपास केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी १५ जूनला रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान दारासिंग दलसिंग चौहान (वय ४०, रा. जयनगर बेसा) हे आपल्या कुटुंबासोबत बॅग व पिशवी घेऊन ऑटो क्रमांक एम. एच. ४९, ए. आर-८६७७ ने नागपूर बसस्थानकावरून श्रीकृष्णनगर बेसा रोड येथे उतरून घरी आले. घरी आल्यानंतर त्यांना आपली काळ्या रंगाची बॅग ऑटोत विसरल्याचे लक्षात आले. त्यांनी ऑटोचालकास भेटून बॅगबाबत विचारपुस केली असता त्याने आपणास काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे दारासिंग यांना आपले सोन्याचांदीचे दागिने किंमत २ लाख १२७ रुपये चोरीला गेल्याचे समजले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.