जयंत पाटील महायुतीत येण्यासाठी संपर्कात : धर्मरावबाबा आत्राम यांचा दावा
By कमलेश वानखेडे | Updated: August 26, 2024 17:28 IST2024-08-26T17:26:28+5:302024-08-26T17:28:49+5:30
Nagpur : नागपुरात पत्रकारांशी बोलताना आत्राम यांचा दावा

Jayant Patil in contact to join the 'MahaYuti' - Dharmaraobaba Atram's claim
नागपूर : माझ्या विरोधात शरद पवार गटाने उमेदवार दिला तरी मी भीत नाही. मी लढणार आहे, असे सांगत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे महायुतीत येण्यासाठी आपल्या संपर्कात असल्याचा दावा अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला.
सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना आत्राम म्हणाले, लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आदिती तटकरे याच्या उपस्थितीत ३१ ऑगस्टला नागपुरात आयोजित कार्यक्रमात वाटप होईल. लाडकी बहीण योजनेत ३ हजार रुपये पोहचले. मोठा परिणाम म्हणून महिलांचा सहभाग वाढला आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे. दिव्यांगाना साहित्य वाटप होत आहे.
विरोधकांना बजेट कळत नसल्याने ते लाडकी बहीण योजना बंद होईल, असा आरोप करत आहेत. आदिवासींसाठी असलेले बजेट लाडकी बहीण योजनेसाठी वळते केले नाही, असा दावाही त्यांनी केला.