मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी लागतील १ कोटी ; एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो सांगत उकळले १४ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:31 IST2026-03-12T18:27:53+5:302026-03-12T18:31:26+5:30
Nagpur : एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका विद्यार्थिनीच्या पालकांना १४ लाखांचा गंडा घालण्यात आला. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

It will cost 1 crore to make a girl a doctor; 14 lakhs was raised by claiming to get admission in MBBS
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका विद्यार्थिनीच्या पालकांना १४ लाखांचा गंडा घालण्यात आला. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
निर्मल नयन पांडे (४५, रामानिकनगर, बेलतरोडी) असे आरोपीचे नाव आहे. संजय महादेवराव धवस (४८, संगम, हिंगणा, एमआयडीसी) हे तक्रारदार आहेत. त्यांची मुलगी बारावी पास झाली होती व तिला डॉक्टर व्हायचे होते. मात्र, तिला 'नीट'मध्ये कमी गुण पडले होते. शिकवणी वर्गातील परिचिताद्वारे तिला आरोपीबाबत माहिती मिळाली. तिने पालकांना याबाबत सांगितले. संजय धवस हे त्याला गाडगेनगर, हिंगणा मार्ग येथील कन्सल्टन्सी कार्यालयात जाऊन भेटले. आरोपीने त्यांना दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देईल असा दावा केला. त्यासाठी १.२० कोटी रुपये खर्च लागेल असेदेखील त्याने सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून धवस यांनी त्याला २ जुलै २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान १४ लाख रुपये दिले.