पुन्हा नागपुरात परतली थंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:30 IST2020-12-31T23:29:25+5:302020-12-31T23:30:43+5:30

cold again, nagpur news मागील आठवड्यात जरा कमी झालेली थंडी पुन्हा परतली आहे. दोन दिवसांपासून थंडीचा पारा घसरल्याने त्याचा परिणाम वातावरणावर जाणवायला लागला आहे.

It was cold again in Nagpur | पुन्हा नागपुरात परतली थंडी

पुन्हा नागपुरात परतली थंडी

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : मागील आठवड्यात जरा कमी झालेली थंडी पुन्हा परतली आहे. दोन दिवसांपासून थंडीचा पारा घसरल्याने त्याचा परिणाम वातावरणावर जाणवायला लागला आहे.

नागपुरात गुरुवारी दिवसभर थंडी जाणवत होती. सायंकाळनंरतर थंडीची तीव्रता अधिकच जाणवली. तरीही नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक उत्साहात घराबाहेर पडलेले दिसले. नागपुरातील गुरुवारचे तापमान १४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. विदर्भात गोंदियातील वातावरण सर्वाधिक थंड होते. १२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद तिथे झाली. चंद्रपूरचे तापमान १४.२, तर गडचिरोलीचे १३.४ नोंदविले गेले. या दोन्ही ठिकाणी गेल्या २४ तासांत एक अंशाने घट झाली आहे.

अकोला आणि बुलढाणा येथे १५.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावतीमध्ये १५.५ अंशांची नोंद झाली. वर्धा शहरात १४.२ अंशांची नोंद झाली असून, गेल्या २४ तासांत पारा ०.२ अंशाने उतरला आहे. येत्या आठवडाभरात असेच वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: It was cold again in Nagpur