शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

पर्यावरण व आर्थिक धोरण सोबत चालविणे अत्यावश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:12 AM

ग्लोबल वॉर्मिंग, वातावरण बदल या समस्या येत्या ३० वर्षात गंभीर रूप धारण करणार आहेत. मात्र अजून ३० वर्षे वेळ आहे असा विचार करून दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील.

ठळक मुद्देईश्रेईच्या ‘ऊर्जावरण’ परिषदेत व‘तावरण बदलावर मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्लोबल वॉर्मिंग, वातावरण बदल या समस्या येत्या ३० वर्षात गंभीर रूप धारण करणार आहेत. मात्र अजून ३० वर्षे वेळ आहे असा विचार करून दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे या अल्प काळात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पावले उचलावी लागतील. तंत्रज्ञानाने भरीव प्रगती केली आहे आणि त्याचा उपयोग करावा लागेल. भारतासारख्या विविधता असलेल्या देशात अधिक परिश्रम घ्यावे लागेल. हा विचार करून उद्योजकांसाठी वेगळा व सामान्य जनतेसाठी वेगळा दृष्टिकोन ठेवून योजना आखणे आवश्यक आहे. पर्यावरण आणि आर्थिक धोरण सोबत चालविणे अत्यावश्यक झाल्याचे विचार इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचे विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. अशोक मोखा यांनी व्यक्त केले.इंडियन सोसायटी आॅफ रेफ्रिजरेटर, हिटिंग अ‍ॅन्ड एअर कंडिशनिंग इंजिनीअर्स (ईश्रेई) संस्थेच्यावतीने वातावरण बदलामुळे उद््भवणारे धोके आणि भविष्याच्या सुरक्षेसाठी उपायांवर संखोल मंथन करण्यासाठी ‘ऊर्जावरण’ परिषदेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी डॉ. मोखा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ईश्रेईचे क्षेत्रीय संचालक शंकर सपालिका, नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष दिलीप मिर्झापुरे व सचिव नरेंद्र पाम्पट्टीवार प्रामुख्याने उपस्थित होते. परिषदेत प्रामुख्याने हिटिंग, कूलिंग व रेफ्रिजरेशन आदींशी संबंधित उद्योग आणि पर्यावरण यावर विशेषत्वाने भर होता. डॉ. मोखा यांनी मानवीय भावनेतून पर्यावरणाचा विषय हाताळणे गरजेचे असल्याचे सांगितले. ऊर्जा बचत हा महत्त्वाचा विषय आहे. आपल्या पूर्वजांनी एका वस्तूच्या वारंवार उपयोगावर भर दिला होता. ही बाब शिकण्यासारखी आहे. कूलिंग उद्योगात वापरणाऱ्या रेफ्रिजरेशनचा वारंवार उपयोग कसा होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला ग्लेशियामधून मिळणाºया पाण्याचे प्रमाण केवळ ४ टक्के आहे व बाकी ९६ टक्के पाणी वनसंपदेमुळे मिळते. त्यामुळे वनसंवर्धन केले तरच पाण्याचे संवर्धन होईल. आपण आंतरिक आवाज ऐकण्यासाठी, आत्म्याशी जुळण्यासाठी मंदिरात जातो. याचप्रमाणे पर्यावरणाचा विषय गंभीरपणे समजण्यासाठी पर्यावरणाशी आत्मीयतेने जुळावे लागेल, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.यावेळी बोलताना शंकर सपालिका यांनी प्रदूषण हे मनुष्यनिर्मित असून इतरांवर दोषारोप करीत बसण्यापेक्षा प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

अंतर्गत शुद्ध हवा प्रत्येकाला आवश्यक : पत्कीपरिषदेच्या दुसºया सत्रात एअरोप्युअर युव्ही सिस्टीमचे उपाध्यक्ष केदार पत्की यांनी ‘इनडोअर एअर क्वॉलिटी’ या विषयावर मार्गदर्शन केले. अनेकदा रुग्णालयात आॅपरेशननंतर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असते. याचे कारण रुग्णालयात पसरलेल्या अशुद्ध हवेमुळे इन्फेक्शन होऊन रुग्ण दगावण्याची शक्यता असते. इजिप्तमध्ये सर्जरीची सुरुवात झाली असे मानल्या जाते व तेही शुद्ध वातावरणातच अशा वैद्यकीय प्रक्रिया पार पाडत असत. भारतातही ऋषिमुनीद्वारे होणारे वैद्यकीय उपचार विशिष्ट वातावरणात केले जायचे. यावरून शुद्धतेचे महत्त्व लक्षात येते. केवळ रुग्णालय चकाचक करून चालत नाही तर तेथे शुद्ध हवा खेळत राहणे आवश्यक आहे. इतर कार्यालयांबाबतही तीच स्थिती गरजेची आहे. अंतर्गत तापमान २२ डिग्री व आर्द्रता ५० ते ६० टक्के आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी किंवा अधिक झाल्यास विषाणुचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. १८ व्या शतकात हवा शुद्धीकरणासाठी अल्ट्राव्हायलेट दिव्यांचा उपयोग केला जायचा, पण त्याचे दुष्परिणाम दिसून आले. मात्र आता तंत्रज्ञान विकसित झाले असून युव्ही लॅम्प इमारतींची अंतर्गत हवा शुद्ध करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती केदार पत्की यांनी दिली.

टॅग्स :environmentवातावरण