शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

नरनाळा किल्ल्याची शासनाकडून प्रस्तुत केली जात आहे चुकीची माहिती? अभ्यासकांकडून नाराजी व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 15:48 IST

Nagpur : नुकत्याच पार पडलेल्या नरनाळा महोत्सवानिमित्त नरनाळा किल्ला चर्चेत आहे. पण शासनाकडून, प्रशासनाकडून आणि अभ्यासकांकडून त्याबद्दल चुकीची माहिती प्रस्तुत केली जात आहे.

नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या नरनाळा महोत्सवानिमित्त नरनाळा किल्ला चर्चेत आहे. पण शासनाकडून, प्रशासनाकडून आणि अभ्यासकांकडून त्याबद्दल चुकीची माहिती प्रस्तुत केली जात आहे. अभ्यासक म्हणून मला याची खंत वाटते. 'वाकाटक नृपति आणि त्यांचा काल' हा ग्रंथ महाराष्ट्राची निर्मिती होण्याच्या पूर्वीचा आहे. आणि नरनाळा किल्ल्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यावरूनच मी नरनाळा किल्ला 'वाकाटककालीन' आहे हे त्रिवार सिद्ध करते आहे. आतापर्यंत मी हे तीनदा सांगून झाले आहे. माझ्या 'उजाड अभयारण्य' (२००९) या पुस्तकात मी प्रथम या संदर्भाचा स्पष्ट उल्लेख केला आहे.

वाकाटक राजे विदर्भाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे व भूषणावह होते. त्यांचा कार्यकाल साधारण इ. स. २१५ ते ४९० पर्यंत मानला जातो. वाकाटक राजे दानशूर आणि साहित्यप्रेमी होते. त्यांनी अनेक देवालये बांधली. अनेक ठिकाणी दानधर्म केला. अनेक काव्याची निर्मिती झाली. महत्त्वाचे म्हणजे कालिदासाचे 'शाकुंतल' हे काव्य अजरामर झाले. कवी कालिदास हा वाकाटक राणी प्रभावती गुप्त हिचा प्रधान होता. प्रभावती गुप्त ही चंद्रगुप्त मौर्य यांची कन्या होती. ती लवकरच विधवा झाल्याने तिच्या पित्याने तिच्या मदतीसाठी कवी कालिदासाला पाठवले होते. म्हणूनच पत्नीचा विरह असह्य होऊन कालिदासाने शाकुंतल लिहिले होते. वाकाटकांच्या दोन शाखा अस्तित्वात होत्या. एक 'नंदीवर्धन' व दुसरी 'वत्सगुल्म'. तर या नंदीवर्धनाची राणी प्रभावती गुप्त आपल्या पुत्रासह ह्या नरनाळ्याला आली होती. नंतर त्यांनी आपली राजधानी प्रवरपूर येथे हलविली होती.

इतिहासातील महत्त्वाचे व विश्वसनीय पुरावे म्हणजे 'शीलालेख' व 'ताम्रपट'. तर ह्या प्रभावती गुप्तचे व तिच्या पुत्राचे अनेक ताम्रपट उपलब्ध आहेत. त्यात पुणे येथील ताम्रपट व ऋद्धपूर येथील ताम्रपट आहेतच; पण तिचा तिरोडी येथील ताम्रपट नरनाळा किल्ल्याच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा आहे. या ताम्रपटात, चक्क नरनाळा किल्ला व वारीचा उल्लेख आहे. हा ताम्रपट मध्य प्रदेशाच्या बालाघाट जिल्ह्यातील करंगी गावाच्या आग्नेयेस आठ मैलांवर तिरोडी गावी मॅगोनीज खाणीजवळ सापडला. या खाणीचे व्यवस्थापक श्री. टी. ए. वेल्स्टेड यांनी तो विदर्भातील श्रेष्ठ व ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. वा. वि. मिराशींकडे प्रकाशनार्थ पाठविला. तो मिराशींनी प्रथम एपिग्राफिया इंडिया पु. २१ मध्ये १६७ पृ. क्र. मध्ये ठशांसह व इंग्रजी भाषांतरासह प्रसिद्ध केला. 'वाकाटक नृपति आणि त्यांचा काल' या पुस्तकात त्या ताम्रपटाचे तेच ठसे त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. विशेष म्हणजे हा 'ताम्रपट' अकोला जिल्ह्यातील 'वारी' या स्थानावरून दिला आहे. तर अकोला जिल्ह्यातील 'वारी' या तीर्थक्षेत्री हा ताम्रपट वाकाटक नृपति दुसऱ्या प्रवरसेनानी दिला याचा स्पष्ट उल्लेख या ताम्रपटात आहे. तेव्हा ह्या ताम्रपटात स्पष्टपणे नरनाळा किल्ल्याचा उल्लेख आहे. आणि शासन म्हणतेय नरनाळा किल्ला आठव्या शतकात निर्माण केला गेला, याला काय म्हणावे? जिथे वाकाटकांची कारकिर्दच पाचव्या शतकापर्यंतची आहे.

प्रस्तुत दानपत्राचा काळ हा द्वितीय प्रवरसेनाच्या तेविसाव्या शासनवष माघ कृष्ण द्वादशी असा दिला आहे. या प्रवरसेनाचे बरेचसे ताम्रपट राजधानीवरून दिले होते. पण हा ताम्रपट 'नरत्तंङ्गवारी' स्थानावरून दिला आहे.

द्वितीय प्रवरसेन आपल्या मातेसह प्रभावती गुप्तसह ष‌ट्तिला एकादशीला स्नान करण्यास 'नरत्तङ्गवारी' स्थानाला आलेला आहे. एकादशीला उपोषण करून दुसऱ्या दिवशी पारण्याला राजाने हा ताम्रपट दिला. हे दान त्याने इतर ऐश्वर्यासह मातेच्या पुण्योपार्जनाकरिता दिले आहे. ह्यामध्ये पित्याचा उल्लेख नाही, मातेचा आहे. याचा अर्थ राणी 'नरनाळा किल्ला' व 'वारी' दोन्ही ठिकाणी आली होती. ह्यापूर्वी चार वर्षाआधी तिने ऋध्दपूर ताम्रपट दिला होता. याचाच अर्थ प्रभावती गुप्त राणी तेव्हा जिवंत होती. आणि अकोला जिल्ह्यातील 'वारी' तीर्थक्षेत्री आली होती. द्वितीय प्रवरसेनाचा कार्यकाल इ. स. ४२० ते ४५० असा आहे. तेव्हा तो या कार्यकालात 'नरतंगगिरीवारीला' आला असावा. आपल्या तेविसाव्या शासन वर्ष म्हणजेच साधारण इ. स.च्या पाचव्या शतकात 'वारी' आणि 'नरनाळा' किल्ला दोन्ही अस्तित्वात होते. म्हणजेच तत्पूर्वी ह्या किल्ल्याची निर्मिती विदर्भातील राज्यकर्त्यांकडून झाली होती. अर्थातच इतिहास तज्ज्ञ हा किल्ला कोणी बांधला हे सांगू शकतील. पण आताच्या लेखांतून जे सांगतात मोगलांनी बांधला ते धादांत चुकीचे ठरते आहे. तसेच 'नरनाळा' ह्या किल्ल्याच्या नावाविषयी चुकीच्या आख्यायिका अस्तित्वात आहेत. राजपूत राजा नरनाळसिंग याच्या नावावरून 'नरनाळा' नाव आले नसून ते 'नरतंगगिरी' पासून आले आहे, जे वाकाटकांच्या ताम्रपटात आहे. 'नरनाळा किल्ला' पाचव्या शतकात अस्तित्वात होता. नंतर तो कोण्या कोण्या राजांच्या ताब्यात गेला असावा. कदाचित त्यांनी त्यामध्ये सुधारणाही केल्या असाव्यात. पण त्याच्यावर अष्टकमळं आहेत त्यावरून त्याची निर्मिती ही मोगलांच्या पूर्वीची असावी. थोडक्यात 'नरनाळा किल्ल्याचा' संपूर्ण इतिहास नव्याने शोधण्याची आवश्यकता आहे.. 'नरनाळा किल्ला' हा पूर्वीचा 'नरतंगगिरी' आहे हे तर महामोपाध्याय ता. वि. मिराशी यांनी सांगितलेच आहे. अकोला जिल्ह्याच्या वैभवाचा हा वारसा शास्त्रशुद्ध अभ्यासातून जनतेसमोर यायला हवा. इतिहासाचा विपर्यास नको; सत्याधारित मांडणी हवी, हीच अपेक्षा.

ऐतिहासिक दाखला

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विदर्भातील आद्य इतिहासतज्ज्ञ यांनी आपल्या 'वाकाटक नृपति आणि त्यांचा काल' या ग्रंथात 'नरनाळा किल्ला' म्हणजे नरतंगगिरी याचा निर्वाळा दिला आहे. ते स्पष्टपणे म्हणतात, 'नरतंगगिरीवारी' हे जोडनाव आहे. त्याचा अर्थ नरतंगा जवळचे वारी असा असावा. हे 'वारी' अकोला जिल्ह्याच्या आकोट तहसिलातील बाण नदीवरील सध्या उजाड असलेले वारी गाव असावे, याला 'भैरवगड' असेही म्हणतात व हे अद्यापि पुण्यक्षेत्र म्हणून गणले जाते. 'नरतङ्ग' वारी गावापासून पश्चिमेस अठरा मैलांवरचे 'नरनाळा' असावे. तेथे एक जुना किल्ला आहे, असे ते लिहितात. वाण नदीचे पूर्वीचे नाव बाणगंगाच होते नंतर 'वाण नदी' झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Incorrect information about Narnala Fort presented by government, experts express displeasure.

Web Summary : Experts claim Narnala Fort is from the Vakataka period, citing historical records and inscriptions, contradicting government claims of an 8th-century origin. They emphasize the need for renewed historical research.
टॅग्स :nagpurनागपूर