शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोग बूथ कॅपचरिंग करत आहे का?

By कमलेश वानखेडे | Updated: November 29, 2024 16:12 IST

नाना पटोले यांचा सवाल : ईव्हीएमवर एवढे प्रेम का ?

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतदानाच्या शेवटच्या तासात झारखंडमध्ये मते वाढली, पण ते प्रमाण फक्त दीड टक्का होते. मात्र, महाराष्ट्रमध्ये ७.६ टक्के मतदान वाढले. हे मतदान रात्री कसे वाढले, एवढी मोठी लाईन कुठे लागली, त्या लाईनचे फोटो निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणी करीत निवडणूक आयोग बूथ कॅपचरिंग करत आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, आपण निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले त्यावर उत्तर देण्याचा आयोगाने अयशस्वी प्रयत्न केला. सायंकाळी ६ नंतर ६२.२ टक्के मतदान झाल्यावर रात्री ६६.५ टक्के मतदान झाल्याचे सांगतात. ९ लाख मते कशी वाढली याचे उत्तर आयोगाने द्यावे. सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोग पारदर्शक कारभार असल्याचे सांगतात, मग ईव्हीएमचे एवढे प्रेम का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या विरोधात राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबविली जाईल. लाखो लोकांच्या स्वाक्षरीसह मुख्य निवडणूक आयोगाला पत्र दिले जाईल. आम्ही न्यायालयीन लढाई लढू, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारू, जण भावनेची लढाई लढू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेले सरकारमतदान वाढले त्याचा फायदा कोणाला होतो याची चर्चा होते, पण निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. आम्ही मतदान वाढवले असे आयोग ट्विट करते, पण हे मतदान कसे वाढले, याचे स्पष्टीकरण देत नाही. हे लोकांचा मतांनी नव्हे तर निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेले सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

पाच दिवस होऊनही सरकार अस्तित्वात नाहीमुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णय भाजप नेचे घेतील. पण निकाल लागून पाच दिवस झाले तरी सरकार अस्तित्वात आले नाही, हे चिंताजनक आहे. एकनाथ शिंदे नाराज आहेत की आणखी कुणी याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगnagpurनागपूरcongressकाँग्रेसMahayutiमहायुतीEVM Machineईव्हीएम मशीन