शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंप वितरणात अनियमितता

By admin | Updated: July 10, 2014 00:56 IST

कृषी पंपांना वीज कनेक्शन देणे राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरली असताना वीज वितरण कंपनी महावितरणने यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची शंका व्यक्त केली आहे.

महावितरणची शंका : प्रत्येक अर्जाची होणार तपासणी नागपूर : कृषी पंपांना वीज कनेक्शन देणे राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरली असताना वीज वितरण कंपनी महावितरणने यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची शंका व्यक्त केली आहे. यासोबतच कंपनीने कृषी पंप वितरणाशी संबंधित प्रत्येक प्रक्रियेची आपल्या स्तरावर चौकशी सुद्धा सुरू केली आहे. महावितरण कंपनीनुसार मागील पाच वर्षांमध्ये दहा लाखापेक्षा अधिक कनेक्शन देण्यात आल्यावर सुद्धा १ लाख ६७ हजार अर्ज अजूनही प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. त्यामुळे यात निश्चितच कुठे ना कुठे अनियमितता झालेली आहे. प्रतीक्षा यादी वाढत असल्याचे दाखविण्यासाठीच कंत्राटदारांसह संगनमत करून कृषी पंप कनेक्शनाचे बोगस आकडे तयार केले जात असल्याची महावितरणला शंका आहे. प्राथमिक चौकशीत अनियमिततेची शंका नाकारता येत नाही. राज्य सरकारवर कृषी पंप कनेक्शन देण्यासाठी मोठा दबाव आहे. विशेषत: विदर्भामध्ये जिथे सरकारवर बॅकलॉग संपवण्याचीही जबाबदारी आहे. माहितीनुसार याच गतीने कृषी पंप कनेक्शनचे वितरण केले तर बॅकलॉग समाप्त व्हायला १०० वर्षे लागतील. राज्यपालांनीसुद्धा सरकारला तातडीने बॅकलॉग दूर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे महावितरणने निर्णय घेतला आहे की, अर्ज करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कनेक्शन दिले जाईल आणि अर्जावर तात्काळ कारवाई केली जाईल. यानंतरही प्रतीक्षा यादी वाढतच आहे. सध्या राज्यभरात १ लाख ६७ हजार अर्ज या यादीमध्ये आहेत. महावितरणला या संख्येवर शंका आहे. मागील ५ वर्षात १० लाखापेक्षा अधिक कनेक्शन दिल्यानंतरही इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज शिल्लक कसे काय राहू शकतात, याचीच चौकशी केली जात आहे. मुंबईस्थित मुख्यालयातून पथक पाठविले जात आहे. या पथकाद्वारे प्रतीक्षा यादीतील अर्जाची चौकशी केली जाईल. (प्रतिनिधी)४३७ अर्जांपैकी ७२ जणांकडे कनेक्शन विशेष पथकाद्वारे प्राथमिक चौकशीत ४३७ अर्जांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ७२ अर्जदारांकडे कनेक्शन असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे कनेक्शन असूनही प्रतीक्षा यादीमध्ये यांची नावे कशी काय सामील करण्यात आली. त्याप्रमाणे ८० अर्जदारांना कनेक्शन देण्यात आलेले आहे. मात्र एकही बील सादर करण्यात आलेले नाही. कंपनीतर्फे नागपूर परिमंडळमध्ये करण्यात आलेल्या तपासणीमध्ये प्रतीक्षा यादीतील ३२ अर्जदारांपैकी ३० जणांना कनेक्शन जारी झालेले आहेत. त्याचप्रमाणे नांदेडमध्ये २६ पैकी २६ जणांना, नाशिकमध्ये २५ पैकी १५ जणांना कनेक्शन मिळालेले आहेत.