शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती संग्रहालयातील ‘ट्रॉफीं’ची चौकशी

By admin | Updated: September 7, 2014 00:55 IST

विनापरवानगी शेकडो दुर्मिळ वन्यप्राणी व पक्ष्यांच्या ‘ट्रॉफी’ परस्पर नष्ट करणाऱ्या मध्यवर्ती संग्रहालय प्रशासनाविरुद्ध नागपूर वन विभागाने कारवाई सुरू केली आहे. यात शनिवारी चौकशी अधिकारी सहायक

वन विभागाची कारवाई : वाघ, बिबट्याच्या ‘ट्रॉफी’ परस्पर नष्ट नागपूर : विनापरवानगी शेकडो दुर्मिळ वन्यप्राणी व पक्ष्यांच्या ‘ट्रॉफी’ परस्पर नष्ट करणाऱ्या मध्यवर्ती संग्रहालय प्रशासनाविरुद्ध नागपूर वन विभागाने कारवाई सुरू केली आहे. यात शनिवारी चौकशी अधिकारी सहायक वनसंरक्षक बी. एच. विरसेन, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते व सेमिनरी हिल्सचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. कोलनकर यांनी या प्राणिसंग्रहालयात जाऊन, येथे सध्या उपलब्ध असलेल्या वन्यप्राण्यांच्या ट्रॉफींचे मोजमाप करून, नष्ट करण्यात आलेल्या ट्राफींची माहिती घेतली. या दरम्यान अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्याची माहिती आहे. उपराजधानीचे वैभव असलेल्या या संग्रहालयात वाघ, बिबट, चितळ, हरीण, सांबर व नीलगाय अशा विविध वन्यप्राण्यांसह दुर्मिळ पक्ष्यांच्या ‘ट्रॉफी’ संग्रहित करून ठेवण्यात आल्या आहेत. परंतु येथील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यापैकी शेकडो ट्रॉफींना बुरशी लागल्याने त्या खराब झाल्या होत्या. त्यावर प्रशासनाने वन विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, गत २००३ ते २००५ दरम्यान त्या सर्व ट्रॉफी नष्ट करून, त्यांची परस्पर विल्हेवाट लावली आहे. शहरातील ‘सृष्टी’ या संस्थेचे सदस्य विनीत अरोरा यांनी माहितीच्या अधिकारात संग्रहालयाकडून मागितलेल्या माहितीतून गत काही दिवसांपूर्वी त्याचा भांडाफोड झाला आहे. यात स्वत: संग्रहालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार खराब झालेल्या ट्रॉफींची विल्हेवाट लावण्यासाठी येथील प्रशासनाने गत २ जून २००५ मध्ये सहायक अभिरक्षक, प्राणीचर्मपूरक व आर्टिस्ट यांची एक संयुक्त समिती स्थापन करून, त्या समितीच्या अहवालानुसार संग्रहालयात एकूण ४४६ ट्रॉफी असून, त्यापैकी १६६ खराब झाल्या होत्या. त्यामध्ये विविध वन्यप्राण्यांचे १९ चामडे, ६ माऊंडेड हेड व ८४ बॉटल पेसीमेन्सचा समावेश होता. समितीने त्या सर्व ट्रॉफी नष्ट करण्याची शिफारस केली होती. त्यावर संग्रहालयाचे अभिरक्षक मधुकर कठाणे यांनी सर्व ट्रॉफी नष्ट करण्याची मंजुरी दिली. त्यानुसार ट्रॉफी नष्ट करण्यात आल्या. वन विभागाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, ही कारवाई सुरू केली आहे. (प्रतिनिधी)