शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

नागपुरातील अंधांचे प्रेरणास्रोत राधाताई बोरडे हरपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 12:20 AM

अंध मुलींसाठी निवासी वसतिगृह स्थापन करून त्यांना स्वावलंबी करणाऱ्या अंधांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ४५०० हून अधिक पुस्तकांचे ग्रंथालय उभारणाऱ्या, अंध असूनही समाजातील लोकांसाठी डोळसपणे काम करणाऱ्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त राधाताई बोरडे यांचे गुरुवारी अपघातात दुर्दैवी निधन झाले.

ठळक मुद्देअपघातात दुर्दैवी निधन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंध मुलींसाठी निवासी वसतिगृह स्थापन करून त्यांना स्वावलंबी करणाऱ्या अंधांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ४५०० हून अधिक पुस्तकांचे ग्रंथालय उभारणाऱ्या, अंध असूनही समाजातील लोकांसाठी डोळसपणे काम करणाऱ्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त राधाताई बोरडे यांचे गुरुवारी अपघातात दुर्दैवी निधन झाले.गुरुवारी सायंकाळच्या सुमारास राधाताई भाचीच्या दुचाकीवर मानेवाडा रोडवरून जात असताना, गाडी अचानक पंक्चर झाली. गाडीचा तोल गेल्याने त्या खाली पडल्या. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. मेडिकलमध्ये त्यांना उपचारासाठी नेले असता, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.लहानपणीच आजारात दृष्टी गमावूनही जिद्दीने सर्व कठीण परिस्थितीवर मात करत अंधांच्याच नव्हे तर डोळसांसमोरही स्वकायार्तून राधाताई बोरडे इखनकर यांनी आदर्श निर्माण केला. अंधांसाठी वाचनालयाच्या स्थापनेबरोबरच ‘उत्कर्ष असोसिशन फॉर ब्लार्इंड’ ही संस्था सुरू केली. त्याअंतर्गत अंध मुलींसाठी त्या ‘संस्कार’ निवासी वसतिगृह सुरू केले. याशिवाय जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त पांढऱ्या काठ्यांच्या वाटपाबरोबर, दिवाळीचा फराळ आणि प्रत्येकी १० किलो तांदळाचे वाटप करून गरिबांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने दिवाळी त्या साजरी करीत होत्या.शिक्षणाची प्रचंड जिद्द असलेल्या राधाताई नागपूर विद्यापीठात एम.ए. ला द्वितीय आल्या होत्या. पुंडलिक बोरडे यांच्याशी विवाह झाला. तेही दृष्टिहीन आहेत. शिक्षक व्हायचे स्वप्न असलेल्या राधा यांनी बी.एड.ही केले आणि चार वर्षे लेक्चरर म्हणून काम केले. मात्र मुलगी मधुराच्या वेळी बाळंतपणाच्या गुंतागुंतीत त्यांना नोकरी सोडावी लागली.‘अंध महिला विकास बहुउद्देशीय संस्थे’च्या माध्यमातून सामाजिक कार्यास सुरुवात केली होती. दृष्टी नसणे हे त्याच्या समाजकार्याच्या आड आले नाही. पुढे त्या संगीत विशारदही झाल्या. राधाताईने २००४ मध्ये ‘लुई-राम’ वाचनालय घरातच अपुऱ्या जागेत सुरू केले. त्यांचे काम पाहून एका सद्गृहस्थांनी ५०० रुपयांच्या मासिक भाड्यावर मोठी जागा वाचनालयासाठी दिली. आज या ग्रंथालयात २००० ब्रेल लिपीतील पुस्तकांसह ४५०० पुस्तके असून त्याचा लाभ सगळेच जण घेत आहेत. अंध मुलींना स्वयंपाक करता यावा यासाठी त्या राज्यभरात शिबिर घेत होत्या.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर