शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

विद्यार्थ्यांच्या जेवणात सोंडे; नागपुरातल्या क्रीडा प्रबोधिनीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:59 AM

राज्यभरातून क्रीडा प्रशिक्षणासाठी नागपुरात आलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणात सोंडे निघाल्याची तक्रार केल्याच्या कारणावरून क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य सुभाष रेवतकर यांनी तक्रारकर्त्यांच्या कानशिलात हाणल्याचा आरोप क्रीडा प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देतक्रार केल्यामुळे प्राचार्यांकडून मारहाण झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातून क्रीडा प्रशिक्षणासाठी नागपुरात आलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणात सोंडे निघाल्याची तक्रार केल्याच्या कारणावरून क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य सुभाष रेवतकर यांनी तक्रारकर्त्यांच्या कानशिलात हाणल्याचा आरोप क्रीडा प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्रीच्या सुमारास मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.नागपुरातील कोराडी रोडवरील मानकापूर क्रीडा संकुल येथे असलेल्या क्रीडा प्रबोधिनीतर्फे राज्यभरातील निवडक विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येत असते. त्याच अनुषंगाने १० जूनपासून व्हॉलिबॉल आणि अ‍ॅथ्लेटिक्स क्रीडा प्रकारातील प्रशिक्षणासाठी राज्यभरातून ४० विद्यार्थी संकुलात दाखल झाले आहेत. हे प्रशिक्षण वर्षभरासाठीचे असते. मात्र, प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.शौचालयात पाणी नाही, शौचालयातील पाणीच जेवण बनविण्यासाठी वापरले जाते, दोन्ही वेळ दिले जाणारे जेवण निकृष्ट प्रतीचे आहे, सर्वत्र घाण असून स्वच्छता कर्मचारी नाही, जेवणात सोंडे आढळत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी सुरुवातीला मौखिक स्वरूपात संबंधितांना दिल्या. मात्र, या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यानंतर, या समस्यांची माहिती देणारे लेखी पत्र तक्रार स्वरूपात क्रीडा प्रबोधिनीच्या वॉर्डनला दोनवेळा देण्यात आले. वॉर्डनकडून या तक्रारी सोडविल्या जात नसल्याचे समजताच, विद्यार्थ्यांनी तक्रारींचा मोर्चा प्रबोधिनीचे प्राचार्य सुभाष रेवतकर यांच्याकडे वळवला. मात्र, तक्रारी ऐकून घेण्याऐवजी प्राचार्यांनी तक्रारकर्त्या मुलांवरच हात उगारल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. तक्रारींचे निवारण करण्याऐवजी मुलांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करीत सोमवारी संध्याकाळच्या सुमारास प्रबोधिनीच्या ४० विद्यार्थ्यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात एकसाथ तक्रार देण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने आदित्य बाळकृष्ण बुधेल यांच्यासह आकाश दुर्गे, सचिन जाधव, रोहन यादव, मुकुल खोडके, धनुष कांबळे, सोहेल खान, आदर्श वाकोडे, वैभव भंगे, रितेश माने या विद्यार्थ्यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री प्रबोधिनीच्या वॉर्डन, प्राचार्य व प्रशासकाविरोधात तक्रारनोंदवली आहे.मेस चालकाला शनिवारी टर्मिनेट करणार-सुभाष रेवतकरमुलांनी गेल्या आठवड्यात जेवणासंदर्भात तक्रार केली होती. मेस चालकाला जेवणात सुधारणा करण्यासंदर्भात सांगितलेही होते. पण, सोमवारी विद्यार्थ्यांनी निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे आरडाओरड केली. त्यामुळे मेस चालकाला बोलावून घेतले. त्याला समजवीत असताना मुले तिथे आली आणि मेस चालकाला शिवीगाळ करू लागली आणि त्याच्या अंगावर धावून गेली. त्यामुळे मी मुलांवर चिडलो. पण मुले ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मी शिवीगाळ केल्याचा आरोप करीत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. माझा उद्देश केवळ शनिवारपर्यंत मेस सुरू ठेवण्याचा होता. शनिवारी मेस चालकाला टर्मिनेट करणार आहे. तोपर्यंत मुलांना दोनवेळचे जेवण मिळावे, ही अपेक्षा होती. त्यात मुलांवर मी रागावलो. माझा दुसरा कुठलाही हेतू नव्हता, असे प्राचार्य सुभाष रेवतकर म्हणाले.

टॅग्स :fraudधोकेबाजी