इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले राज्यातून अव्वल

By मंगेश व्यवहारे | Published: October 13, 2023 01:54 PM2023-10-13T13:54:02+5:302023-10-13T13:54:32+5:30

नागपुरातील इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला ८५.२ टक्के गुण

Indora Urban Primary Health Center becomes top in maharashtra | इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले राज्यातून अव्वल

इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले राज्यातून अव्वल

नागपूर : केंद्र शासनाच्या केंद्रीय आरोग्य व परिवार मंत्रालय दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाअंतर्गत नागपुरातील इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला ८५.२ टक्के गुण प्राप्त झाले. महाराष्ट्रात इतर नागरी प्राथमिक केंद्रापैकी हे गुण सर्वाधिक असल्याने राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला. 

 मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या हस्ते इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक आयुक्त  प्रकाश वराडे, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सरला लाड, डॉ. अश्विनी निकम, डॉ.राजेश बुरे,  निलेश बाभरे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आंचल गोयल यांच्या हस्ते मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिकउर रहेमान खान, इंदोरा यूपीएचसी येथील जीएनएम सील्विया सोनटक्के,  वर्षा चव्हाण, फार्मसीस्ट सोनाली सरोदे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी यांनी प्रमाणपत्र देण्यात आले.

Web Title: Indora Urban Primary Health Center becomes top in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.