इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा १२ जूनपासून
By निशांत वानखेडे | Updated: June 11, 2025 19:05 IST2025-06-11T19:04:03+5:302025-06-11T19:05:29+5:30
नागपूर विभागात १८ हजाराहून अधिक परीक्षार्थी : देशभरात २५० विषयांचे पेपर

Indira Gandhi Open University's undergraduate, postgraduate exams from June 12
निशांत वानखेडे
नागपूर : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नु) द्वारे चालविण्यात येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा १२ जूनपासून देशभरात सुरू हाेत आहेत. जवळपास २५० विषयांचे पेपर परीक्षेदरम्यान हाेणार असून १९ जुलैपर्यंत ही परीक्षा चालणार आहे.
इग्नुचे नागपूर विभागीय केंद्राअंतर्गत विदर्भातील ७ व मराठवाड्यातील ३ अंशा १० परीक्षा केंद्रांमध्ये या परीक्षा घेतल्या जाणार आहे. नागपूर मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ येथे परीक्षा केंद्र आहे, तसेच मध्यवर्ती कारागृहात तेथील बंदिवानांसाठी सुद्धा परीक्षा घेण्यात येत आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहात सुद्धा कैद्यांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. इतर परीक्षा केंद्र गडचिराेलीचे गाेंडवाना विद्यापीठ आणि अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड व खामगाव या ठिकाणी आहेत. नागपूर विभागात परीक्षेसाठी एकूण १८,९७३ विद्यार्थी बसणार आहेत. त्यापैकी नागपूर केंद्रामध्ये ११,५१७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती इग्नुच्या नागपूर विभागीय केंद्राचे विभागीय संचालक डॉ. लक्ष्मण कुमारवाड यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात नागपूरसह पुणे व मुंबई विभागातही या परीक्षा हाेत आहेत.