शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा अंतराळ कार्यक्रम समाज विकासासाठी

By admin | Updated: May 14, 2016 03:02 IST

जगभरातील प्रगत देश अंतराळाचा कार्यक्रम हा आपापल्या देशातील सुरक्षा व्यवस्था आणि मिलिटरीच्या सक्षमतेसह विविध कामासाठी करतात.

राष्ट्रीय तंत्रज्ञानदिन : एसव्हीसी कामेश्वर राव यांचे प्रतिपादननागपूर : जगभरातील प्रगत देश अंतराळाचा कार्यक्रम हा आपापल्या देशातील सुरक्षा व्यवस्था आणि मिलिटरीच्या सक्षमतेसह विविध कामासाठी करतात. परंतु भारतातील अंतराळ कार्यक्रम हा जगापेक्षा वेगळा आहे. भारतातील इस्रोमार्फत राबविण्यात येत असलेला अंतराळ कार्यक्रम हा पूर्णपणे समाज विकासाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन क्षेत्रीय सुदूर संवेदन केंद्र मध्यचे (इस्रो) मध्यचे महाव्यवस्थापक डॉ. एस.व्ही.सी. कामेश्वर राव यांनी येथे केले. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त बुधवारी नीरीतर्फे ‘भारतीय अंतराळ कार्यक्रम’ या विषयावर नीरी सभागृह येथे त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नीरीचे कार्यकारी निदेशक डॉ. तपस नंदी होते. डॉ. कामेश्वर राव हणाले, डॉ. विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आहेत. भारताचा संपूर्ण अंतराळ कार्यक्रम हा मानव विकासाला केंद्रबिंदू ठरवूनच राहिलेला आहे. गेल्या ४० वर्षांत भारतीय अंतराळ कार्यक्रमाने सामाजिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय राष्ट्रीय उपग्रहा(इन्सॅट)ने दूरदर्शन प्रसारण व हवामान सेवा उपलब्ध केली जाते; तर भारतीय रिमोट सेन्सिंग उपग्रहाद्वारे नैसर्गिक संसाधने, कृषी क्षेत्र, आपत्ती व्यवस्थापनाची सेवा दिली जाते. एकूणच कनेक्टिव्हीटी, कम्युनिकेशन, गव्हर्नन्स, शिक्षण, आरोग्य, कृषी, वन, पर्यावरण, पाणी आदींच्या उपयोगासाठी याचा वापर केला जातो. या सर्वांचा मुख्य केंद्रबिंदू मानवाचा विकास हाच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. राव यांनी यावेळी इस्रोचा संपूर्ण कार्यक्रम प्रेझेंटेशनद्वरे समजावून सांगितला. डॉ. तपस नंदी यांनी स्वागतपर भाषण करीत डॉ. राव यांचा परिचय करून दिला. जया सब्जीवाले यांनी संचालन केले. डॉ. प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)