शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संगीताच्या उपेक्षेची खंत वाटते

By admin | Updated: January 11, 2015 00:48 IST

भारतीय संगीताकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतीय संगीत, साहित्य आणि कलांकडे विदेशातील लोकांचा ओढा विलक्षण असलेला मी अनुभवतो आहे. त्याउलट भारतात मात्र

पं. स्वपन चौधरी : विदेशातील नव्या पिढीत भारतीय संगीताचे गांभीर्य नागपूर : भारतीय संगीताकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतीय संगीत, साहित्य आणि कलांकडे विदेशातील लोकांचा ओढा विलक्षण असलेला मी अनुभवतो आहे. त्याउलट भारतात मात्र आपल्याच संगीताची उपेक्षा होत आहे. नवी पिढी पाश्चात्त्य संगीतात रममाण होते आहे. याच्याकडे ना सरकारचे लक्ष आहे ना येथील कलारसिकांचे. आपल्याच देशात आपल्या संगीताची उपेक्षा होते, याची खंत व्यक्त करीत पं. स्वपन चौधरी यांनी भारतीय संगीतासारखे दुसरे संगीत नाही, असे म्हटले. गेली ३४ वर्षे आपण कॅलिफोर्निया आर्ट आॅफ तबला अँड परफार्मिंग आर्ट रिसर्च युनिर्व्हसीटीत शिकवित आहोत. गेल्या काही वर्षापूर्वी भारतीय संगीताविषयी इतके वेड मी अनुभवले नाही पण सध्याची पिढी मात्र भारतीय संगीत शिकण्यासाठी तेथे अतिशय गंभीर आहे. भारतात मात्र आपले संगीत शिकण्यापेक्षा प्रत्येकालाच अभियंता आणि डॉक्टर व्हायचे आहे. या देशाला संगीतकारांचीही गरज आहे. कॅलिफोर्नियात दोन गटात तज्ज्ञ समितीने एक अभ्यास नोंदविला. संगीत शिकणारा आणि न शिकणारा मुलांचा गट. यात वर्षाअखेर संगीत शिकणाऱ्या मुलांचा बुद्ध्यांक ८० पेक्षा जास्त तर न शिकणाऱ्या मुलांचा ५० पेक्षा कमी आढळला. त्यानंतर प्रत्येक शाळेत संगीत अनिवार्य करण्यात आले. आपल्याकडे मात्र संगीत हा विषय दुय्यम समजला जातो. प्रत्यक्षात संगीताच्या भरवशावरच फार मोठ्या संख्येत लोकांचे पोट भरते आहे आणि त्यांना प्रतिष्ठाही मिळते आहे. यासाठी शासनाने किमान तीन संगीत वाहिन्या सुरू कराव्यात. आवड असलेल्या मुलांना संगीतात भविष्य घडवू द्यावे आणि पालकांनीही त्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)