शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
3
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
4
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
5
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
6
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
7
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
9
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
10
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
11
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
12
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
13
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
14
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
15
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
16
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
17
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
18
मोठी घडामोड! होर्मुज मार्ग खुला करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...
19
टिंडरवर मैत्री, भेटायला बोलावलं; जेवताना ती म्हणाली बाथरूममध्ये जा, बाहेर येताच तरुणाचा खेळ खल्लास!
20
हे भगवान! ५०१ रुपयांचं 'यंत्र' विकत घेतलं, १० वर्षं देवघरात पूजा केली; Reel पाहून उघडलं तेव्हा धक्काच बसला!
Daily Top 2Weekly Top 5

"भारताची प्रमुख शस्त्र निर्यातदार बनण्याकडे वेगाने वाटचाल, खासगी क्षेत्राचा...", राजनाथ सिंह यांचे विधान

By योगेश पांडे | Updated: January 18, 2026 21:06 IST

दारूगोळ्याच्या पुरवठ्यात कमतरता जाणवत होती. केंद्र सरकारने धोरणांमध्ये बदल करून आणि प्रक्रिया सुलभ करून हे क्षेत्र खुले केले, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

-योगेश पांडे, नागपूरदेश आत्मनिर्भरतेच्या दिशेने पावले टाकत असताना संरक्षण उत्पादनात खासगी क्षेत्राच्या सहभागाबाबत आव्हाने व शंका होत्या. मात्र संरक्षण उत्पादनांच्या संशोधन आणि विकासाच्या बाबतीत खासगी क्षेत्र आता सार्वजनिक क्षेत्राच्या पुढे आहे. यामुळेच भारत एक प्रमुख शस्त्र निर्यातदार देश बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. रविवारी सोलर इंडस्ट्रीजमध्ये मध्यम क्षमतेच्या दारूगोळा प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

संरक्षण उत्पादनांबाबत खासगी क्षेत्रात क्षमता आणि संभाव्यता होती. परंतु त्यांचा सहभाग कमी प्रमाणात होता. दारूगोळ्याच्या पुरवठ्यात कमतरता जाणवत होती. केंद्र सरकारने धोरणांमध्ये बदल करून आणि प्रक्रिया सुलभ करून हे क्षेत्र खुले केले. आता चांगल्या दर्जाचे उत्पादन वेळेवर पूर्ण होत आहे, तसेच उत्पादकता आणि वितरणात सुधारणा होत आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रात खाजगी क्षेत्राचे योगदान उत्पादनाच्या किमान ५० टक्के असावे यावर भर देण्यात येत आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले. 

२०१४ मध्ये देशांतर्गत संरक्षण उत्पादन ४६,००० कोटी रुपये होते, ते आता १.५० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. त्यात खाजगी क्षेत्राचे योगदान ३०,००० कोटी रुपये आहे, अशी माहिती संरक्षणमंत्र्यांनी दिली. यावेळी त्यांनी पिनाका क्षेपणास्त्रे तसेच 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये वापरलेल्या नागास्त्र ड्रोनसारख्या विविध संरक्षण उत्पादन क्षमतांसाठी सोलर समूहाचे कौतुक केले.

५० हजार कोटींच्या निर्यातीचे लक्ष

१० वर्षांपूर्वी संरक्षण उत्पादनांची निर्यात केवळ हजार कोटी रुपये होती, परंतु आता ती २५,००० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. २०२९-३० पर्यंत ५०,००० कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

नवीन आयामांमुळे युद्धामध्ये गुंतागुंत वाढीस

युद्धे आता खूप गुंतागुंतीची झाली असून ती केवळ सीमांपुरती मर्यादित राहिलेली नाहीत. ऊर्जा, व्यापार, शुल्क, पुरवठा साखळी, तंत्रज्ञान आणि माहिती हे देखील युद्धाच्या नवीन आयामांचा भाग बनले आहेत. त्यामुळे युद्धांची तीव्रता वाढत आहे. युद्धाचे स्वरूप खूप वेगाने बदलत आहे. नवीन पद्धती समोर येत आहेत. त्याचे परिणाम थेट सामान्य जनतेला जाणवत आहेत, याकडे संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहDefenceसंरक्षण विभाग