शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भारतात वर्षभरात २८ लाख क्षयरोगाच्या रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:04 IST

दहा मृत्यूच्या प्रमुख कारणात क्षयरोगाचा समावेश आहे. जगभरात क्षयरोगाचे १०.४ दशलक्ष नवे रुग्ण आढळून येतात. गेल्या वर्षी म्हणजे २०१७ मध्ये भारतात क्षयरोगाचे २७ लाख ९० हजार नवे रुग्ण आढळून आले यातील ४ लाख ३५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देसाडे चार लाख रुग्णांचा मृत्यू : खासगी डॉक्टरांकडून नि:शुल्क उपचाराची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहा मृत्यूच्या प्रमुख कारणात क्षयरोगाचा समावेश आहे. जगभरात क्षयरोगाचे १०.४ दशलक्ष नवे रुग्ण आढळून येतात. गेल्या वर्षी म्हणजे २०१७ मध्ये भारतात क्षयरोगाचे २७ लाख ९० हजार नवे रुग्ण आढळून आले यातील ४ लाख ३५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी डॉक्टरांसह प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी उचलायला हवी, असा सूर शहरातील प्रसिद्ध फुफ्फुसरोग तज्ज्ञांनी काढला.२४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा केला जातो. या रोगाला घेऊन जनजागृतीसाठी गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेचे शहरातील फुफ्फुसरोग तज्ज्ञ सहभागी झाले होते. यात डॉ. रविंद्र सरनाईक, मेडिकलचे विभाग प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम, मेयोच्या विभाग प्रमुख डॉ. राधा मुंजे, डॉ. राजेश स्वर्णकार, डॉ. ज्ञानशंकर मिश्रा, डॉ. समीर अरबट, डॉ. विवेक गुप्ता, डॉ. विक्रांत देशमुख, डॉ. समुेध चौधरी, डॉ. विनीत निरंजने, डॉ. गौतम मोहरील, डॉ. विक्रम राठी, डॉ. जितेंद्र जैसवानी, डॉ. सुहास टिकले व डॉ. राजेश बलाल उपस्थित होते.रोज ४५०० रुग्णांचा मृत्यू-डॉ. सरनाईकडॉ. रवींद्र सरनाईक म्हणाले, वैद्यकीय उपचारांमध्ये बरीच प्रगती झाली असलीतरी क्षयरोग हा प्रथम क्रमांकाचा जीवघेणा रोग आजही कायम आहे. जगात या रोगाने रोज ४५०० रुग्णांचा मृत्यू होतो. यातच हे जंतू विविध औषधांना प्रतिरोध निर्माण होऊन दाद देत नसल्याने एका मोठ्या महाभयानक परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे. परिणामी, क्षयरोगाचे उच्चाटनाचे प्रयत्न विफल ठरत आहे.नि:शुल्क उपचार पद्धती-डॉ. स्वर्णकारडॉ. राजेश स्वर्णकार म्हणाले, क्षयरुग्णाला लवकरात लवकर औषधोपचार मिळावा म्हणून व क्षयरोगाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून केंद्र शासनाने ‘युएटीबीसी’ प्रकल्प हाती घेतला आहे. यात खासगी डॉक्टर्स व औषध दुकानांना सहभागी करून घेतले आहे. या प्रकल्पांतर्गत खासगी डॉक्टरला क्षयरुग्णाच्या नोंदणीसाठी ५०० रुपये व उपचार पूर्ण झाल्यावर ५०० रुपये शासन देणार आहे. शिवाय, नेमलेल्या औषध दुकानांमधून नि:शुल्क औषध मिळणार आहे.चार दशलक्ष एचआयव्हीबाधितांचा मृत्यू-डॉ. मुंजेडॉ. राधा मुंजे म्हणाल्या, एचआयव्ही बाधितांसाठी क्षयरोग धोकादायक ठरत आहे. जगात १०.४ दशलक्ष नवे क्षयरोगाचे रुग्ण आढळून येतात, यात १० टक्के एचआयव्ही बाधित असतात. २०१६ मध्ये १.७ दशलक्ष रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू झाला यात ‘.४’ दशलक्ष एचआयव्हीबाधित होते. सध्या मल्टीड्रग रेझिसटन्ट टीबी (एमडीआर-टी) एक नवे आवाहन देशापुढे आहे. २०१६ मध्ये ‘एमडीआर’चे ०.५ दशलक्ष रुग्ण आढळून आले होते.शहरात ‘एक्सडीआर’चे ११ रुग्ण-डॉ. मिश्राडॉ. ज्ञानशंकर मिश्रा म्हणाले, क्षयरोगाचे जे रुग्ण व्यवस्थित औषधी (डॉट्स) घेत नाही किंवा अर्धवट घेतात त्यांना क्षयरोगाची पुढची पायरी ‘मल्टीड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’ (एमडीआर-टीबी) आणि त्याहीपुढे जाऊन ‘एक्सटेसिव्ह ड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’ (एक्सडीआर-टीबी) होतो. नागपुरात सध्या ‘एमडीआर’चे १२६ तर ‘एक्सडीआर’चे ११ रुग्ण आहेत. या रुग्णाच्या संसगार्तून वर्षातून डझनभर सामान्य व्यक्तींना हा आजार सहज होऊ शकतो.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर