शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘प्लेसमेन्ट’ झालेल्या विद्यार्थ्यांचे वाढले ‘टेन्शन’; परीक्षांचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 10:34 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आला असल्यामुळे सर्व विद्यापीठांमधील परीक्षा रखडल्या आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे ‘कॅम्पस प्लेसमेन्ट’ झाले आहे व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जुलै ते सप्टेंबरमध्ये ज्यांना रुजू व्हायचे होते, त्यांची चिंता जास्त वाढली आहे.

ठळक मुद्देआर्थिक संकट असताना कंपन्या नवीन कर्मचारी ठेवतील का?

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आला असल्यामुळे सर्व विद्यापीठांमधील परीक्षा रखडल्या आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे ‘कॅम्पस प्लेसमेन्ट’ झाले आहे व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जुलै ते सप्टेंबरमध्ये ज्यांना रुजू व्हायचे होते, त्यांची चिंता जास्त वाढली आहे. तोपर्यंत परीक्षाच झाली नाही तर रुजू होता येईल का व आर्थिक संकटाच्या काळात कंपन्यादेखील प्लेसमेन्ट कायम ठेवतील का, असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर पडला आहे.सर्वसाधारणत: तिसऱ्या वर्षानंतर किंवा अंतिम वर्षाच्या पहिल्या सत्रात कॅम्पस प्लेसमेन्टच्या प्रक्रियेला सुरुवात होते. अभियांत्रिकी, व्यवस्थापन महाविद्यालयांत याचे प्रमाण जास्त असते. २०१९-२० या सत्रासाठी अनेक विद्यार्थ्यांना त्यातून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये थेट काम करण्याची संधीदेखील मिळाली होती. कंपन्यांच्या नियमांनुसार अंतिम सत्राची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. अनेक आयटी कंपन्यांकडून सर्वसाधारणत: सप्टेंबर-ऑक्टोबरच्या अगोदर विद्यार्थ्यांना रुजू करण्यात येते.कोरोनामुळे मार्च महिन्यातच लॉकडाऊन घोषित झाला व त्यानंतर परीक्षाच झालेल्या नाहीत. जर वेळेत परीक्षाच झाल्या नाहीत तर कंपन्या उशिरा रुजू होण्यासंदर्भात सूट देतील का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न पडला आहे. विद्यार्थ्यांसमोर पडलेला दुसरा मोठा प्रश्न हा तर थेट आर्थिक संकटाशी निगडित आहेत. बहुतांश कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशा स्थितीत वेळेत परीक्षा झाल्या व चांगले गुण मिळाले तरी कंपन्या आपल्याला रुजू करून घेतील का, ही चिंतादेखील त्यांना सतावते आहे.

कंपन्यांकडून सहकार्य मिळेलनामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेन्टची एक प्रक्रिया असते. त्यानुसार आमचे विद्यार्थी सर्वसाधारणत: जुलैमध्ये रुजू होतात. परंतु यंदा परीक्षाच झाल्या नसल्यामुळे वेळापत्रकात बदल करणे अनिवार्य आहे. आम्ही कंपन्यांना तसे कळविले असून विद्यार्थ्यांना काही आठवडे उशिरा रुजू होण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. कंपन्यांकडून सकारात्मक उत्तर येत आहे. आयटी कंपन्यांमध्ये काही प्रश्नच नाही. परंतु कोअर क्षेत्राशी निगडित कंपन्यांकडून अजून फारसे प्रतिसाद आलेले नाहीत. त्यांच्याकडूनदेखील निश्चित सहकार्य मिळेल अशी आशा आहे. आम्ही विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन सर्व स्थिती सांगितली आहे, असे व्हीएनआयटीचे सहयोगी अधिष्ठाता (ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेन्ट) डॉ.राहुल राळेगावकर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरूविद्यार्थ्यांकडून निश्चितपणे प्लेसमेन्टबाबत विविध प्रश्न विचारण्यात येत आहेत. जोपर्यंत परीक्षांचे निकाल येत नाहीत, तोपर्यंत बहुतांश कंपन्या रुजू करून घेणार नाहीत ही बाब खरी आहे. परंतु जुलै महिन्यात सर्व परीक्षा होऊन ऑगस्टमध्ये निकाल लागतील अशी आशा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही, असे मत रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे अधिष्ठाता (प्लेसमेन्ट) डॉ. जयप्रकाश पालीवाल यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :jobनोकरी