एसटीच्या प्रवाशांची वाढली संख्या : गणेशपेठ बसस्थानकावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 20:10 IST2021-06-07T20:09:37+5:302021-06-07T20:10:53+5:30
Unlock Crowd at Ganeshpeth bus stand अनलॉकच्या पहिल्याच दिवशी एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे गणेशपेठ बसस्थानकावर गर्दी पाहावयास मिळाली. गणेशपेठ बसस्थानकावरून पहिल्याच दिवशी ३६९ फेऱ्यांची वाहतूक करण्यात आली.

एसटीच्या प्रवाशांची वाढली संख्या : गणेशपेठ बसस्थानकावर गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनलॉकच्या पहिल्याच दिवशी एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे गणेशपेठ बसस्थानकावर गर्दी पाहावयास मिळाली. गणेशपेठ बसस्थानकावरून पहिल्याच दिवशी ३६९ फेऱ्यांची वाहतूक करण्यात आली.
लॉकडाऊनच्या कालावधीत एसटीच्या मोजक्याच फेऱ्या सुरू होत्या. नागपूर विभागाचे उत्पन्न दररोज ४८ लाख होते. परंतु प्रवाशांना अत्यावश्यक कारणासाठी प्रवास करण्याची अट प्रशासनाने घातल्यामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे विभागाचे उत्पन्न दोन लाखावर आले होते. परंतु अनलॉकच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांनी एसटीला प्रतिसाद दिल्यामुळे गणेशपेठ बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळाली. पहिल्या दिवशी गणेशपेठ बसस्थानकावरून अमरावतीसाठी ७० फेऱ्या, काटोलसाठी ३४, रामटेक १८, हिंगणघाट २३, भंडारा ७९, उमरेड ४४, चंद्रपूर २४, यवतमाळ ५४ आणि सावनेरसाठी २३ फेऱ्या सोडण्यात आल्या. एकूण ३६९ फेऱ्यांची वाहतूक पहिल्याच दिवशी नोंदविण्यात आली आहे. उद्यापासून आणखी प्रवाशांची संख्या वाढणार असल्याचा विश्वास गणेशपेठचे आगार व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी व्यक्त केला आहे.